Share Market : आज कोणते टॉप 10 शेअर्स करतील परफॉर्म? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : आज कोणते टॉप 10 शेअर्स करतील परफॉर्म?

शुक्रवारी कमकुवत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला. सेन्सेक्स-निफ्टी दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाले होते. बीएसईचे सर्व सेक्टरल इंडेक्स घसरले आणि निफ्टीचेही सर्व सेक्टरल इंडेक्स लाल चिन्हात बंद झाले होते.

रियल्टी, आयटी आणि फार्मा शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. पॉवर, ऑटो आणि कंझ्युमर गुड्सच्या शेअर्समध्ये विक्री झाली. सेन्सेक्स 461.22 अंकांनी म्हणजेच 0.75 टक्क्यांनी घसरून 61,337.81 च्या पातळीवर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 145.90 अंकांच्या अर्थात 0.79 टक्क्यांच्या घसरणीसह 18,269.00 च्या पातळीवर बंद झाला.

हेही वाचा: Yes Bank Shares : शेअर्सच्या वाढीनंतर येस बँकेने उचलले मोठे पाऊल; कर्जा संदर्भात घेतला निर्णय

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

जागतिक बाजारात घसरण दिसून आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. तर जागतिक बाजाराच्या धर्तीवर भारतीय बाजारातही विक्री झाल्याचे मेहता इक्विटीजचे प्रशांत तपासे यांनी सांगितले.

यूएस फेड महागाई आणि व्याजदर वाढीबाबत आपली भूमिका बदलणार नाही, अशी चर्चा सुरू आहे. यूएस फेड आपले दर 4.6 टक्क्यांवरून 5.1 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते असे संकेत आहेत. सध्या महागाई ही सर्वात मोठी चिंता आहे.

निफ्टीने 18400 चा महत्त्वाचा सपोर्ट तोडत त्याखाली बंद झाला. आता निफ्टीला पुढील सपोर्ट त्याच्या 50 दिवसांच्या SMA वर असेल म्हणजेच -18100-18000 वर सपोर्ट असेल. तर, वरच्या बाजूला 18400 हा निफ्टीचा पहिला रझिस्टंस आहे.

जर निफ्टीने हा पार केला, तर पुन्हा एकदा त्याच्या 20 दिवसांच्या SMA म्हणजेच 18550 च्या पातळीला स्पर्श करताना पाहू शकतो. यानंतर निफ्टी 18700 च्या दिशेने जाताना दिसतो.

हेही वाचा: FD On Digital Rupee : डिजिटल रुपीमध्ये FD करता येऊ शकते का? वाचा काय आहे RBI नियम

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  1. अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  2. महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  3. बीपीसीएल (BPCL)

  4. एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)

  5. डॉ. रेड्डी (DRREDDY)

  6. पर्सिस्टंट (PERSISTENT)

  7. एबीबी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (ABB)

  8. भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  9. झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

  10. पेज इंडिया (PAGEIND)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.