esakal | Share Market: मोठ्या पडझडीनंतर भांडवली बाजार तेजीत 
sakal

बोलून बातमी शोधा

sensex share market.

पाचव्या आणि शेवटच्या दिवसाच्या सत्रात जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे देशातील भांडवली बाजार तेजीत आला आहे.

Share Market: मोठ्या पडझडीनंतर भांडवली बाजार तेजीत 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: आज (शुक्रवारी) भांडवली बाजाराच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवसाच्या सत्रात जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे देशातील भांडवली बाजार तेजीत आला आहे. सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्स 378 अंशांनी वधारून  40,107 अंशांवर स्थिरावला आहे. तर दुसरीकडे निफ्टीतही (Nifty) वाढ झाली आहे. आजच्या सत्रात निफ्टी 42.80 अंशांनी वधारून 11,723.15 अंशांवर पोहचला आहे.

सत्राच्या सुरुवातीला इन्फोसिस, इंडसइंड बँक आणि एचडीएफसी बँक सर्वाधिक वेगाने व्यवहार करत असताना दिसले. भांडवली बाजारातील एचसीएल टेक, इन्फोसिस आणि माइंडट्री हे सर्वाधिक सक्रिय शेअर्स आहेत. विवध क्षेत्रांचा विचार केला तर आयटी क्षेत्रातील निर्देशांक एक टक्क्याहून अधिक वाढला आहे. मोठ्या शेअर्ससह मिडकॅप शेअर्सहीची खरेदी होत आहेत.

बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.64 टक्के दराने भांडवली व्यवहार करत आहे. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांकही 0.51 टक्के दराने व्यवहार करत आहे. तेल-गॅसच्या शेअर्समध्येही आज वाढ दिसून येत आहे. बीएसईचा तेल आणि गॅस निर्देशांक 0.42 टक्के दराने व्यवहार करत आहे.

वाचा सविस्तर: Share market: सेन्सेक्स तब्बल 1065 अंशांनी कोसळला

गुरुवारी भांडवली बाजार 1 हजार अंशांनी आपटला होता-
मागील सत्रात म्हणजे गुरुवारी भांडवली बाजारात मोठी पडझड झाली होती. युरोपात कोरोनाची दुसरी लाट आल्याने देशातील भांडवली बाजार 1 हजारांपेक्षा जास्त अंशांनी कोसळला होता. जवळपास 2.70 टक्क्यांनी सेन्सेक्स घसरला होता. युरोपमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्याची स्थिती झाली आहे. फ्रान्समध्ये शनिवारपासून लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्याचा फटका भारतीय भांडवली बाजाराला बसल्याचे अर्थतज्ज्ञांनी सांगितले आहे. 

(edited by- pramod sarawale)