
भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. ओएनजीसी, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी, एल अँड टी आणि एक्सिस बँकच्या शेअर्सला फायदा झाल्याचे दिसत आहे.
मुंबई- आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या वाढत्या मागणीमुळे सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 200 अंकांनी वाढून नव्या उच्च स्तरावर पोहोचला आहे. विदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीमुळे शेअर बाजाराला बळ मिळाले आहे.
दिवसाच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स 201.65 अंकांनी (0.41 टक्के) वाढून 49,718.76 अंकावर पोहोचला. तत्पूर्वी सेन्सेक्स 49,776.29 अंकांसह आपल्या सार्वकालिक उच्च स्तरावर गेला होता. निफ्टीची सुरुवातही चांगली झाली. बाजार सुरु होताच 70.55 अंकांनी वाढून तो 14,634 अंकावर पोहोचला.
हेही वाचा- अखेर टेस्लाचे भारतात आगमन; एलॉन मस्क यांची महाराष्ट्राऐवजी दुसऱ्या राज्याला पसंती
भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. ओएनजीसी, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी, एल अँड टी आणि एक्सिस बँकच्या शेअर्सला फायदा झाल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे टायटन, कोटक बँक, डॉ. रेड्डीज, टीसीएस आणि एचसीएल टेकच्या शेअरला नुकसान सोसावे लागत आहे.
यापूर्वी मार्चमध्ये सेन्सेक्स खालच्या स्तरावर पोहोचल्यानंतर 8 ऑक्टोबरमध्ये तो 40 हजारचा आकडा पार करत 40,182 वर पोहोचला होता. तर 5 नोव्हेंबरला सेन्सेक्स 41,340 वर बंद झाला होता. 10 नोव्हेंबर रोजी इंट्राडेमध्ये इंडेक्सचा स्तर 43,227 वर पोहोचला होता. तर 18 नोव्हेंबर रोजी 44,180 आणि 4 डिसेंबर रोजी 45,000 आकडा पार केला. 9 डिसेंबर रोजी सेन्सेक्स पहिल्यांदाच 46,000 च्या वर 46,103.50 च्या स्तरावर बंद झाला. 14 डिसेंबर रोजी सेन्सेक्स 46,284.7 वर सुरु झाला.
तर 21 डिसेंबर रोजी सेन्सेक्स 47,055.85 च्या स्तरावर पोहोचला. आता 30 डिसेंबर रोजी सेन्सेक्स आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर 47,807.85 अंकावर गेला होता. त्यानंतर नव्या वर्षात 48 हजारचा स्तर पार करत सेन्सेक्स बुधवारी 6 डिसेंबर रोजी 48,816.66 नव्या शिखरावर उघडला होता. 8 डिसेंबरला सेन्सेक्स 48,797.97 या नव्या स्तरावर पोहोचला. तर 12 जानेवारी रोजी 49,569.14 अंकाला स्पर्श केला आणि आता 13 जानेवारी रोजी सेन्सेक्स एका नव्या शिखरावर 49,776.29 वर पोहोचला.