esakal | अखेर टेस्लाचे भारतात आगमन; एलॉन मस्क यांची महाराष्ट्राऐवजी दुसऱ्या राज्याला पसंती
sakal

बोलून बातमी शोधा

elon muskj

अमेरिकेची दिग्गज इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे (Tesla Motors India) अखेर भारतामध्ये आगमन झाले आहे

अखेर टेस्लाचे भारतात आगमन; एलॉन मस्क यांची महाराष्ट्राऐवजी दुसऱ्या राज्याला पसंती

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- अमेरिकेची दिग्गज इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे (Tesla Motors India) अखेर भारतामध्ये आगमन झाले आहे. टेस्लाने बेंगळुरुमध्ये एक शोध विकास कंपनीची स्थापना केली आहे. मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी ट्विटरवरुन याची पुष्टी केली आहे. येडियुरप्पा यांनी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क (CEO Elon Musk) यांना शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टेस्लाच्या भारतातील आगमनाची घोषणा केली होती. 

महाराष्ट्र राज्याला लस वितरण करताना केंद्र सरकारने घेतला आखडता हात

येदियुरप्पाने ट्विट केलंय की, कर्नाटक देशातील ग्रीन वाहतुकीचे केंद्र बनेल. इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्ला (US electric car giant Manufacturer) बंगळुरुच्या यूनिटसोबत लवकर भारतात आपला व्यवसाय सुरु करेल. मी एलॉन मस्क यांचे स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. टेस्ला भारतात व्यवसाय सुरु करावा यासाठी कमीतकमी पाच राज्ये कंपनीशी संपर्कात आहे. टेस्लाने कर्नाटकची राजधानी बेंगळुरुमध्ये एका कंपनीची नोंदणी केली आहे. 

कंपनी गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू सरकारांसोबत संपर्कात आहे. महाराष्ट्र सरकार टेस्लाने भारतात गुंतवणूक करावी यासाठी प्रयत्नशील आहे, तसेच यासंबंधी कंपनीसोबत चर्चाही झाली होती. महाराष्ट्र ऑटोमोबाईल मॅन्यूफॅक्चरिंगसाठी प्रसिद्ध आहे. पुण्यातील चाकण हा भाग मोठा ऑटोबाईल हब आहे. येत्या काळात टेस्ला महाराष्ट्रातही गुंतवणूक करेल, अशी आशा आहे

UN मध्ये भारतानं चीनला सुनावलं; 'दहशतवादी' घोषित करण्याच्या...

एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करत भारतात व्यवसाय सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते. टेस्लाचे मॉडेल 3 भारतात सर्वात आधी लाँच केले जाणार आहे. मॉडेल 3 टेस्लाच्या सर्वात स्वस्त गाड्यांपैकी एक आहे. याची किंमत 55 लाख आहे. सांगितलं जातंय की, जानेवारीच्या शेवटपर्यंत या कारचे बुकींग सुरु होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्यातच टेस्ला आता भारतीय बाजारात प्रवेश करत आहे. 

दरम्यान,  एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीनं 185 बिलियन डॉलरहून (13,579 अब्ज रुपयांपेक्षा जास्त) अधिक झालीय. टेस्ला आणि स्पेस-एक्स या दोन कंपन्यांमुळे एलॉन मस्क यांना सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिलं स्थान पटकावता आलं आहे. 7 जानेवारी 2021 रोजी टेस्लाच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या आणि मस्क थेट श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचले आहेत. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांना मागे टाकून इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

loading image