Multibagger stock : एस्ट्रल लिमिटेडच्या शेअर्स मध्ये एका वर्षात 135 टक्क्यांची वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

astral ltd

भविष्यात एस्ट्रल लिमिटेडच्या शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल करतील असा शेअर बाजार तज्ज्ञांना विश्वास आहे.

एस्ट्रल लिमिटेडच्या शेअर्स मध्ये एका वर्षात 135 टक्क्यांची वाढ

एस्ट्रल लिमिटेडचा स्टॉक हा मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. एका वर्षाच्या कालावधीत, हा स्टॉक सुमारे 135 टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 चे एस्ट्रलचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आहेत. कंपनीच्या पाईप व्यवसायात दुसऱ्या तिमाहीत वार्षिक 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय, कंपनीच्या अॅडहेसिव्ह व्यवसायात वार्षिक 37 टक्के वाढ झाली आहे.

हेही वाचा: आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती आणि कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

एस्ट्रलला बाजाराच्या कंसोलिडेशनचा फायदा होईल, असे एडलवाईसचे (Edelweiss) म्हणणे आहे. याशिवाय, पीव्हीसीच्या वाढत्या किमती पाहता CPVC पाईप्सकडे वाढता कल याचाही कंपनीला फायदा होईल. याशिवाय, सॅनिटरी वेअर, ट्रॅक, इन्फ्रा पाइप लॉन्च करून कंपनीने व्यवसायात आणखी वाढ केली आहे. कंपनीचा बाजार हिस्सा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे त्याचा कॅश फ्लोही वाढत आहे. कंपनीची व्हॉल्यूम ग्रोथ तिच्या बरोबरीच्या कंपन्यांपेक्षा चांगली आहे. कंपनीचे लक्ष वाढीवर आहे, त्यामुळे ते सतत नवनवे प्रॉडक्ट्स लाँच करत आहे.

हेही वाचा: म्युच्युअल फंड घ्यावा, की शेअर्स?

बाजारपेठेतील प्रवेश वाढवण्यासाठी ॲस्ट्रल आपले ब्रँडिंग आणि वितरण नेटवर्क विस्तारण्यावरही लक्ष केंद्रित करत आहे, ज्यामुळे प्लास्टिक पाईप आणि फिटिंगसारख्या व्यवसायाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. जोरदार मागणी लक्षात घेता, कंपनीचा महसूल 2022 च्या आर्थिक वर्षात 10 अब्ज रुपये होऊ शकतो अशी शक्यता आहे. कारण उत्पादन खर्चात झालेल्या वाढीला सामोरे जाण्यासाठी किमती वाढवण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे. त्यामुळे त्याचे मार्जिनही सुधारण्याची अपेक्षा आहे. हे लक्षात घेऊन एडलवाईसने (Edelweiss) या शेअरमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा: Share Market : 'हे' 2 शेअर्स देऊ शकतील कमी वेळेत जास्त परतावा

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top