
तज्ज्ञांनी भारती एअरटेलमध्ये खरेदीचे रेटिंग कायम ठेवले आहे.
Bharti Airtel : मोठ्या घसरणीनंतर शेअर्समध्ये होणार 30 टक्के वाढ
भारती एअरटेल इंडस टॉवरमधील 4.7 टक्के हिस्सेदारी Vodafone Plc कडून विकत घेणार असल्याची घोषणा नुकतीच केली. दुसरीकडे, भारती एअरटेलने (Bharti Airtel) आर्थिक वर्ष 2022 च्या नऊ महिन्यांत आपला बाजारातील हिस्सा मजबूत वाढवला आहे. भारती एअरटेलच्या आर्थिक वर्ष 2022 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी ट्रायने जारी केलेल्या सबस्क्राइबर डेटानुसार, कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीत मार्केट शेअरमध्ये जोरदार वाढ झाली आहे.
हेही वाचा: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
त्यामुळेच तज्ज्ञांनी भारती एअरटेलमध्ये खरेदीचे रेटिंग (Buy rating) कायम ठेवले आहे. भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओच्या ग्राहक डेटावरून असे दिसून येते की या दोन्ही कंपन्यांनी तिसऱ्या तिमाहीत मुख्यतः A आणि B सर्कलमध्ये नवीन सब्सक्रायबर्स जोडण्यात यश मिळवले आहे. या दोन कंपन्यांच्या कमाईत A आणि B सर्कलचा वाटा 70 टक्क्यांहून अधिक आहे.
आर्थिक वर्ष 2022 च्या 9 महिन्यांत मेट्रो आणि ए सर्कलमध्ये भारती एअरटेलच्या ग्राहकांच्या संख्येत 2-3.6 टक्के वाढ झाल्याचे जेफरीजने एका नोटमध्ये म्हटले आहे. विशेष बाब या तिमाहीत, भारती एअरटेलने मेट्रो शहरांमधील बाजारपेठ रिलायन्स जिओकडून हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. जेफरीजनेही भारती एअरटेलमध्ये बाय रेटिंग कायम ठेवताना 910 रुपयांच्या टारगेटसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा: 5 वर्षात दिला 500 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न, तुमच्याकडे आहे का 'हे' शेअर्स?
गेल्या 3 महिन्यांत व्होडाफोन इंडियाचा बाजारातील हिस्सा स्थिर राहिला आहे. येत्या काळात बाजारातील शेअरमध्ये कोणतेही मोठे उलथापालथ होण्याची शक्यता नाही, त्यामुळे कंपन्यांची वाढ दरवाढीवर अवलंबून असेल असेही जेफरीजने म्हटले आहे. दुसरीकडे ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनीही भारती एअरटेलवर बाय रेटिंग कायम ठेवले आहे. 910 रुपयाच्या टारगेटसाठी भारती एअरटेलचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला मोतीलाल ओसवाल यांनी दिला आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Shares Of Bharti Airtel Plunged 8 Percent In A Month
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..