कोल इंडिया शेअर्सने सलग दुसऱ्या दिवशी गाठला 52 आठवड्यांचा उच्चांक..गुंतवणूकदारांनी काय करावे ?

गेल्या 5 दिवसात या शेअरच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे, म्हणजेच गेल्या 5 दिवसात या शेअरने गुंतवणूकदारांना 10 टक्के परतावा दिला आहे.
share market sensex
share market sensexsakal

शेअर बाजार ही अशी जागा आहे जिथे गुंतवणूकदार पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवू शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला कोणत्याही स्टॉकमध्ये पैसे गुंतवायचे असतील किंवा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही कोल इंडियाच्या (coal India) शेअरमध्ये खरेदी करू शकता असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. कोल इंडियाच्या शेअरच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ होत आहे. गेल्या 5 दिवसात या शेअरच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे, म्हणजेच गेल्या 5 दिवसात या शेअरने गुंतवणूकदारांना 10 टक्के परतावा दिला आहे. (Shares of Coal India have been rising for the last 2 days.)

share market sensex
Share Market: शेअर बाजाराची उसळी; सेन्सेक्स 895 तर निफ्टीमध्ये 256 अंकांची वाढ

कोल इंडियाचे शेअर्स 2 दिवसांपासून सतत वाढत आहे. या शेअरने 20-21 एप्रिलला 52 आठवड्यांच्या उच्चांकालाही स्पर्श केला आहे. त्यानंतरही या शेअरमध्ये वाढ दिसून येत आहे. गुरूवारी हा शेअर सध्याच्या 206.05 वर व्यवहार करत आहे आणि शेअरमध्ये 3.54 टक्क्यांची उसळी पाहायला मिळत आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्च पातळी (week high level) 207.55 रुपये आहे आणि हा शेअर इथून करेक्ट झाला आहे.

share market sensex
Gold-Silver Price: सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

गेल्या 5 दिवसात शेअर्समध्ये 10% वाढ

कोल इंडियाच्या स्टॉकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार वाढ होत आहे. गेल्या 5 दिवसांत शेअरच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, या स्टॉकने 1 वर्षात 64 टक्के परतावा दिला आहे.

शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठींचा सल्ला

मार्केट एक्सपर्ट विकास सेठी यांनी या स्टॉकवर होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. जर गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक असेल तर तो ठेवा असे रे म्हणाले आहेत. कोळशाच्या किमती गगनाला भिडणार असून या कंपनीचे डिव्हीडेंड यील्ड lही चांगले असल्याचे मत तज्ज्ञ विकास सेठी यांनी व्यक्त केले. या स्टॉकमध्ये 225 रुपयांचे टारगेट दिले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com