Go Fashionचे शेअर्स वधारले! गुंतवणूकदारांना तब्बल 91 टक्क्यांचा परतावा

गुंतवणूकदारांना लिस्टिंगवर प्रति शेअर 626 रुपये नफा झाला आहे
Go Fashion Ltd
Go Fashion Ltdesakal
Summary

गुंतवणूकदारांना लिस्टिंगवर प्रति शेअर 626 रुपये नफा झाला आहे.

गो फॅशन लिमिटेडच्या (Go Fashion Ltd) शेअरने शेअर बाजारात बंपर एन्ट्री केली आहे. कंपनीचा स्टॉक बीएसईवर 91 टक्के प्रीमियमसह 1316 रुपयांच्या किंमतीला लिस्ट झाला. इश्यूची किंमत 690 रुपये होती. म्हणजेच, गुंतवणूकदारांना लिस्टिंगवर प्रति शेअर 626 रुपये नफा झाला आहे. शानदार लिस्टींगनंतर प्रॉफीट बुकींग करावे की शेअर्स तसेच ठेवावेत, असा प्रश्न गुंतवणुकदारांना पडला आहे. याबाबत शेअर बाजार तज्ज्ञ काय सांगत आहेत, ते जाणून घेऊयात.

Go Fashion Ltd
शेअर मार्केट : चला, बांधूया गुंतवणुकीचा पिरॅमिड!

गुंतवणूकदारांनी आता काय करावे ?

गो फॅशनचा इश्यू लिस्टींग गेन (Listing Gain)आणि लाँग टर्म दोन्हीच्या बाबतीत चांगला असल्याचे शेअर बाजार तज्ज्ञ सांगत आहेत. कंपनीची लिस्टिंग दमदारच होईल याची अपेक्षा होतीच आणि तसेच झाले. लाँग टर्मसाठी गुंतवणूकदारांनी हे शेअर्स ठेवण्याचा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञांनी दिला आहे. कारण हा स्टॉक आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. तर शॉर्ट टर्मच्या गुंतवणूकदारांनी रु. 1000 चा स्टॉप लॉस ठेऊन पुढे जावे असा सल्ला दिला जात आहे. जसजसा स्टॉक वाढतो तसतसा स्टॉप लॉस ट्रेल करत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कंपनीचा ग्रोथ ट्रॅक रेकॉर्ड मजबूत आहे. गो फॅशन कर्जमुक्त आणि कॅशरीच कंपनी आहे. प्रमोटर्सचाही ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. त्याच वेळी, शेअरचे व्हॅल्युएशन चांगले आहे. पण काही नेगिटीव्ह गोष्टींकडेही लक्ष द्यावे जसे की स्पर्धा जास्त आहे. कंपनी लहान आहे, तर कंपनीची ऑनलाइन विक्रीही कमी आहे.

Go Fashion Ltd
शेअर बाजाराचा या आठवड्यातील 'ग्रीन रेड' आढावा!

गुंतवणूकदारांकडून मजबूत गुंतवणूक

गो फॅशनच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला. एकूणच हा इश्यू आतापर्यंत 135.46 पट सबस्क्राईब झाला आहे. आयपीओमधील 75 टक्के भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (Qualified Institutional Buyers) राखीव होता आणि तो 100.73 पट भरला गेला. त्याच वेळी, 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non Institutional Investors) राखीव होते आणि हा भाग एकूण 262 पट भरला गेला. त्याच वेळी, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के राखीव होते आणि हा भाग 49.70 पट भरला गेला.

निधी कुठे वापरणार ?

आयपीओद्वारे जमा केलेला निधी 120 नवीन एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट सुरु करण्यासाठी वापरला जाईल. याशिवाय, वर्किंग कॅपिटल आणि इतर कॉर्पोरेट गोष्टींसाठी वापरला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com