Tata Group चा 'हा' शेअर येत्या वर्षात देईल भरपूर नफा! शेअर बाजार तज्ज्ञांना विश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Groups Trent Ltd

Tata Group चा 'हा' शेअर येत्या वर्षात देईल भरपूर नफा!

Tata Group Stock : मार्केटमध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेमध्ये तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये (Portfolio) एखादा दर्जेदार स्टॉक समाविष्ट करायचा असेल, तर तुम्ही टाटा ग्रुप कंपनी (Tata Group) टायटन कंपनी लिमिटेडच्या (Titan Company Ltd) शेअर्सचा विचार करु शकता. बाजारातील दिग्गज आणि 'बिग बुल' म्हणून ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये हे शेअर्स समाविष्ट आहेत. तर ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी टॉप रिसर्च आयडियामध्येही या शेअर्सचा समावेश केला आहे.

हेही वाचा: Tata घेऊन येतेय स्वस्तात मस्त सीएनजी कार, काय असतील फीचर्स?

टायटन (Titan): 2,950 रुपयांचे टारगेट

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने टायटनला 'बाय' (BUY on Titan) रेटिंग दिले आहे. तर टारगेट 2,950 रुपये निश्चित केले आहे. याच्यासाठी एक वर्षाहून जास्त काळ टाईम फ्रेम ठेवण्यात आला आहे. 12 जानेवारी 2022 रोजी, ट्रेडिंग सत्रादरम्यान टायटनच्या शेअरची किंमत सुमारे 2622 रुपये होती. म्हणजेच, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 328 रुपये किंवा सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 12 टक्के परतावा मिळू शकतो. गेल्या वर्षभराबाबत हा शेअर जवळपास 71 टक्क्यांनी वधारत मल्टीबॅगर ठरला आहे. गेल्या पाच वर्षांच्या परताव्याच्या चार्टवर नजर टाकल्यास गुंतवणूकदारांना 630 टक्क्यांहून अधिक नफा झाला आहे.

हेही वाचा: लाँच होताच 'Tata Punch'ने जिंकले ग्राहकांचे मन,कार बनली बेस्ट सेलर

राकेश झुनझुनवालांचा फेव्हरिट स्‍टॉक

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा समूहाचा टायटन स्टॉक कायमच फेव्हरिट राहिला आहे. सप्टेंबर 2021 च्या तिमाही डेटानुसार, राकेश झुनझुनवाला आणि असोसिएट्सची टायटन होल्डिंग 4.9 टक्के (43,300,970 शेअर्स) आहे. 12 जानेवारी 2022 रोजी त्याचे मूल्य 11,310.4 कोटी रुपये होते. Trendlyne च्या मते, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या 37 स्टॉक्स आहेत, ज्यांचे मूल्य 12 जानेवारी 2022 रोजी अंदाजे 25,538.7 कोटी रुपये आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top