
या केमिकल कंपनीचे शेअर्स 9 महिन्यांत दामदुप्पट
मुंबई : पारेख ग्रुप कंपनीची केमिकल ट्रेडिंग कंपनी विनाइल केमिकल्स (इंडिया) (Vinyl Chemicals (India)) ही गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरली आहे. यावर्षी त्याचे शेअर्स 173 टक्क्यांहून अधिक मजबूत झाले आहेत, याचा अर्थ गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.
पिडीलाइट इंडस्ट्रीजच्या गुंतवणुकीसह या कंपनीच्या शेअर्समध्ये एका महिन्यात सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीची मार्केट कॅप 1,191.27 कोटी रुपये आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आणि सेन्ट्रल बँकांच्या कडक आर्थिक धोरणांमुळे बाजारात अस्थिर वातावरण आहे. देशांतर्गत बाजारा 2022 मध्ये आतापर्यंत सेन्सेक्स साडेतीन टक्क्यांनी घसरला आहे, पण त्याच वेळी काही शेअर्सने गुंतवणूकदारांच्या पैशांमध्ये दुप्पट वाढ केली आहे.
10 वर्षांपूर्वी विनाइल केमिकल्सचे शेअर्स बीएसईवर 10.34 रुपयांच्या किमतीत होते. तर शुक्रवारी 30 सप्टेंबरला, त्याचा एक शेअर 649.65 रुपयांवर ट्रेड करत होता. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या पैशात केवळ 10 वर्षांत 63 पट वाढ झाली आहे. एखाद्याने विनाइल केमिकल्समध्ये 10 वर्षांपूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज ते 63 लाखांच्या जवळपास पोहोचले असते.
विनाइल केमिकल्स हा पारेख ग्रुप कंपनीचा एक भाग आहे. जून 2022 तिमाहीसाठी कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, पिडिलाइट इंडस्ट्रीची प्रमोटर म्हणून 40.64 टक्के हिस्सेदारी आहे. आधी ती विनाइल एसीटेट मोनोमर तयार करायची, पण आता ती विदेशातून आयात करते आणि भारतात व्यवसाय करते अशी माहिती कंपनीच्या वेबसाइटवर दिली आहे.
चालू आर्थिक वर्षाची तिमाही आधारावर सुरू झालेली सुरुवात कंपनीसाठी चांगली नव्हती. कंपनीचे नेट प्रॉफीट एप्रिल-जून 2022 मध्ये तिमाही आधारावर 1.45 कोटी रुपयांवरून 1.09 कोटी रुपयांवर घसरले. त्याच वेळी, महसूल या कालावधीत 12.05 कोटी रुपयांवरून 31.07 कोटी रुपयांवर घसरला आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.