सराफी बाजारात आज सोनेखरेदीची लगबग 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

पुणे - देशाच्या बहुतांश भागात झालेला समाधानकारक पाऊस, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे मिळालेले पैसे, बाजारातील आकर्षक योजना आणि शुभमुहूर्तावर खरेदीची परंपरा यामुळे दसऱ्याला सराफी बाजारात सोनेखरेदीची लगबग व उत्साह दिसण्याची अपेक्षा सराफ व्यावसायिकांना आहे. 

दसरा हा सोनेखरेदीचा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे, त्यामुळे सोन्याचा भाव आता 10 ग्रॅमला 32 हजार रुपयांच्या पुढे गेला असला, तरी परंपरेमुळे यंदाही उत्साहात सोनेखरेदी होणार असल्याचे व्यावसायिकांचे मत आहे. 

सराफी व्यवसायवाढीबाबत पीएनजी अँड सन्स लि.चे संचालक अमित मोडक म्हणाले, की या क्षेत्रात होणाऱ्या विस्तारामध्ये "रिझनेबल साइझ'च्या ब्रॅंडच्या दुकानांची संख्या वाढत असून, तेथे गर्दी वाढत आहे. याचे कारण सराफी व्यवसायातील असंघटित व्यापाराचा मोठा हिस्सा हा संघटित व्यापार क्षेत्राकडे आकर्षित होत आहे. 

यंदा देशाच्या बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. महाराष्ट्राच्या विशिष्ट भागात कमी पाऊस झाला आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील खरेदीवर थोडा परिणाम जाणवेल. मात्र, शहरी भागात नेहमीसारखा उत्साह असेल, असे "पीएनजी ज्वेलर्स'चे सौरभ गाडगीळ यांनी सांगितले. मात्र, सोन्याचे चढे भाव हे काही प्रमाणात अडथळा ठरू शकतात, असे काही व्यावसायिकांनी सांगितले. 

आजकाल गुंतवणूक म्हणून "गोल्ड ईटीएफ'ची युनिट्‌स आणि "गोल्ड सॉव्हरिन बॉंड्‌स' असे "पेपर गोल्ड' घेण्याकडेही नागरिकांचा कल वाढत असल्याचे गुंतवणूकतज्ज्ञांनी सांगितले. 

पुण्यातील बुधवारचे भाव 
शुद्ध सोने (10 ग्रॅम) -रु. 33,550 
स्टॅंडर्ड सोने (10 ग्रॅम) - रु. 32,210 
शुद्ध चांदी (1 किलो) - रु. 40,000 

बॅंका आज, तर पोस्ट उद्या बंद 
दसऱ्यानिमित्त बॅंकांना गुरुवारी (ता. 18), तर पोस्टाला शुक्रवारी (ता. 19) सुटी असल्याचे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे बॅंका दसऱ्याला बंद राहतील आणि पोस्टाची कार्यालये दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी बंद राहतील. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shopping in gold market today