शॉर्ट टर्मसाठी फ्युचर्स मार्केटचे 'हे' 2 शेअर्स देतील मजबूत कमाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Granules India and SBI

शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी फ्युचर्स मार्केटचे (F&O) 2 शेअर्स खरेदी करण्याचा खात्रीशीर सल्ला दिला आहे.

शॉर्ट टर्मसाठी फ्युचर्स मार्केटचे 'हे' 2 शेअर्स देतील मजबूत कमाई

जर तुम्ही शेअर बाजारात कोणते शेअर्स घ्यायचे याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी तज्ज्ञांनी 2 शेअर्सची माहिती दिली आहे, जे तुम्हाला चांगली कमाई करुन देतील. शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी फ्युचर्स मार्केटचे (F&O) 2 शेअर्स खरेदी करण्याचा खात्रीशीर सल्ला दिला आहे.

शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी

मार्केट एक्सपर्ट आणि सेठी फिनमार्टचे व्यवस्थापकीय संपादक विकास सेठी यांनी फ्युचर्स मार्केटमधील एसबीआय (SBI)आणि ग्रॅन्युअल्स इंडियाचे (Granules India)शेअर्स खरेदी करण्याचे सुचवले आहे.

हेही वाचा: भारतीय शेअर बाजार तेजीत, निफ्टी 18,000 वर

- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

विकास सेठी यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोव्हेंबर फ्युचर्ससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. विकास सेठी यांनी सांगितले की हा स्टॉक वरून दुरुस्त झाला आहे आणि अलीकडेच कंपनीने सप्टेंबर तिमाहीचे मजबूत निकाल सादर केले होते, जे खूप चांगले होते.

एसबीआय (SBI)

- सीएमपी (CMP) - 501 रुपये

- टारगेट (Target) - 515 रुपये

- स्टॉप लॉस (Stop Loss) - 495 रुपये

- ग्रॅन्युअल्स इंडिया (Granules India)

विकास सेठी यांनी दुसरा शेअर फार्मा क्षेत्रातील सांगितला आहे. ही कंपनी अनेक बहुराष्ट्रीय फार्मा कंपन्यांसाठी काम करते. याशिवाय कंपनीचा ट्रॅक रेकॉर्डही चांगला राहिला आहे. कंपनीचे मार्जिन चांगले असून तिमाही निकालही चांगले आले.

हेही वाचा: शेअर बाजार उसळले ; सेन्सेक्स 514 अंश वाढला

- ग्रॅन्युअल्स इंडिया (Granules India)

- सीएमपी (CMP) - 306.20 रुपये

- टारगेट (Target) - 315 रुपये

- स्टॉप लॉस (Stop Loss) - 300रुपये

नोंद : क्रिप्टो मार्केट,शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो,शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top