esakal | स्मार्ट गुंतवणूक : आपल्या पोर्टफोलिओत ‘एमएनसी फंड’ हवाच!
sakal

बोलून बातमी शोधा

स्मार्ट गुंतवणूक : आपल्या पोर्टफोलिओत ‘एमएनसी फंड’ हवाच!

स्मार्ट गुंतवणूक : आपल्या पोर्टफोलिओत ‘एमएनसी फंड’ हवाच!

sakal_logo
By
प्रशांत पाटील

भारतीय भांडवली बाजारात सध्या तेजी विस्तारलेली असून, दिवसागणिक नवनवीन विक्रमी पातळी गाठली जात आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास, ‘निफ्टी ५०’ निर्देशांक जो दुपटीने वाढून १७,००० अंशांवर गेला आहे, तो कोरोनाच्या प्रारंभीच्या संकटात (एप्रिल २०२०) ८००० अंशांपर्यंत घसरला होता.  

अशा दमदार कामगिरीने अनेक नव्या गुंतवणूकदारांना शेअर बाजाराकडे आकर्षित केले आहे. ज्यात चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू आहेत. चांगली गोष्टी अशी, की आतापर्यंत गुंतवणुकीपासून दूर असलेल्या गुंतवणूकदारांना धडा मिळालेला आहे. जर दुसरी बाजू बघितली तर बाजाराने असे काही लोभस चित्र निर्माण केले आहे, की त्यामुळे भूलून जाऊन अनेकांनी घाईगडबड केली आणि चुकीचे निर्णय घेतले. ज्यांना बाजाराची तुलनेने अल्प माहिती आहे अशा नवशिक्या गुंतवणूकदारांकडून या गोष्टी घडल्या.

तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओत बहुराष्ट्रीय कंपन्यांचा (एमएनसी) समावेश करावा का?

एखादी कंपनी बहुराष्ट्रीय होण्याचे मूळ कारण म्हणजे त्यांनी सुरवातीपासून मिळविलेले व्यावसायिक यश आहे. यशस्वी व्यवसायाचा पुढे परदेशात विस्तार आणि नव्या नियमावलीचा व सामाजिक वातावरणाचा स्वीकार हा त्यांच्या यशाचा मंत्र आहे, ज्यामुळे त्यांची सातत्यपूर्ण चांगली कामगिरी झाली. त्यानंतरच कंपनीला बहुराष्ट्रीय कंपनीचा (एमएनसी) बहुमान मिळतो.

एखादा गुंतवणूकदार अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल, जी सक्रिय किंवा निष्क्रिय असली तरी त्यांची अशा मजबूत कंपनीमध्ये गुंतवणूक असेल, ज्यामागे यशस्वी व्यवसायाची कार्यपद्धती आणि रणनीतीचा इतिहास आहे. प्रदीर्घ काळापासून कुशल व्यवस्थापन सहभागी असल्यासच हे सर्व शक्य आहे. तसेच तांत्रिक कुशलता आणि जागतिक पातळीवरील मजबूत नाममुद्रा हे घटक आहेत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर या कंपन्या व्यवसायात राहतील आणि सातत्यपूर्ण कामगिरी करतील.

उदाहरण द्यायचे, तर कोविड-१९ चे संकट बघा. या प्रसंगात देखील औषधे, ग्राहकोपयोगी वस्तू आणि सेवा, जसे की दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान सुविधा या क्षेत्रातील कंपन्यांनी चांगली कांगिरी केली. खरेतर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या या मंदीवर मात करीत आक्रमकपणे पुढे आल्या.  

‘एमएनसी’आधारित म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सहज आणि सोपा मार्ग जो एमएनसी कंपन्यांच्या व्यापक पर्यायांमध्ये गुंतवणूक करेल. ज्यात तुम्हाला केवळ एकाच क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी न देता विविध उद्योगात व्यवसाय करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे पर्याय उपलब्ध असतील. या श्रेणीत आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल एमएनसी फंड सातत्यपूर्ण कामगिरी करीत आला आहे.

- श्रीप्रसाद बर्डे

(लेखक म्युच्युअल फंड वितरक आहेत.)

loading image
go to top