Shriram AMC Shares : या वर्षीचा पहिला मल्टीबॅगर शेअर, फक्त 11 दिवसांत 110 टक्के रिटर्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shriram AMC Shares

Shriram AMC Shares : या वर्षीचा पहिला मल्टीबॅगर शेअर, फक्त 11 दिवसांत 110 टक्के रिटर्न

Shriram AMC Shares : श्रीराम ऍसेट मॅनेजमेंट कंपनीचे (Shriram AMC) शेअर्स सध्या दमदार कामगिरी करत आहेत. सोमवारी पुन्हा एकदा त्यांना अप्पर सर्किट लागले. या शेअर्समध्ये गेल्या 3 आठवड्यांपासून सातत्याने वाढ होत आहे. या तेजीसह शेअरने एक विशेष कामगिरी आपल्या नावावर केली आहे. हा 2023 सालचा पहिला मल्टीबॅगर स्टॉक बनला आहे.

श्रीराम ऍसेट मॅनेजमेंट हा 2023 च्या सुरुवातीपासून गुंतवणूकदारांना 100% किंवा त्याहून अधिक परतावा देणारा पहिला स्टॉक आहे. 1 जानेवारी रोजी त्याच्या शेअर्सची किंमत 110.15 रुपये होती, ती आता 231.90 रुपये झाली आहे. अशाप्रकारे, 1 जानेवारीपासून आतापर्यंत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 110.53% परतावा दिला आहे. ओयाचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2023 च्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्या 1 लाखाची किंमत 110% ने वाढून 2.10 लाख झाली असती.

कंपनीचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्तिक जैन यांच्या नियुक्तीला मंडळाने मान्यता दिल्यानंतर श्रीराम ऍसेट मॅनेजमेंटच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

श्रीराम एएमसी हा श्रीराम ग्रुपचा एक भाग आहे आणि श्रीराम म्युच्युअल फंडाच्या नावाखाली व्यापार करतो. ही कंपनी सुमारे 2.25 लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करते. ऑगस्ट 2022 मध्ये, कंपनीने आपला 23 टक्के हिस्सा अमेरिकन फर्म मिशन1 इन्व्हेस्टमेंटला विकल्यानंतर आपल्या व्यवसायात नवीन बदल केले. कार्तिक जैन यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्या ब्रँडच्या ग्राहक धोरणाला नवी दिशा मिळेल आणि व्यवसायाची कार्यक्षमता सुधारेल, असे कंपनीने म्हटले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.