'सिल्व्हर लेक'ची 'जिओ' मध्ये 5,655 कोटींची गुंतवणूक

Silver Lake invests Rs 5655 crore in JIO.jpg
Silver Lake invests Rs 5655 crore in JIO.jpg

अमेरिकी कंपनी सिल्वर लेक लवकर जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये पाच हजार 655.75 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीनंतर सिल्व्हर लेकची जिओमध्ये सुमारे 1.15 टक्के हिस्सेदारी असेल.

जिओमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात परदेशी कंपन्यांनी दुसरी मोठी गुंतवणूक केली आहे. या आधी गेल्या महिन्यात 22 एप्रिल रोजी फेसबुकने जिओमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. सिल्व्हर लेकने केलेल्या अभ्यासानुसार जिओ प्लॅटफॉर्मचे बाजार मूल्य सुमारे 4.90 लाख कोटी रुपये आहे. हे फेसबुकने लावलेल्या मूल्यापेक्षा 12.5 टक्के अधिक आहे.

जिओ प्लॅटफॉर्मही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे.
जिओचे सुमारे 38.8 कोटी ग्राहक आहेत. तर सिल्वर लेक ही तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे.

''जागतिक कंपनीकडून खूप काही शिकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, अशी प्रतिक्रिया रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिली. तसेच भारतीय डिजिटल इको- प्रणालीच्या विकासासाठी सिल्व्हर लेकचे महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून स्वागत करताना मला आनंद होत आहे. सर्व भारतीयांना होईल याच फायदा होईल'' असा विश्वास देखील अंबानींनी व्यक्त केला.

''जिओ प्लॅटफॉर्म्सने लहान उद्योग आणि सर्वसामान्य लोकांना कमी दरात डिजीटल तंत्रज्ञान खूप कमी कालावधीत उपलब्ध करुन देण्याचे असामान्य काम केले आहे. बाजारात त्यांच्याकडे असलेली ताकद ही प्रचंड आहे, ''अशी प्रतिक्रिया सिल्वर लेकचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय भागीदारएगॉनडर्बनयांनी दिली.

कर्जमुक्तीकडे वाटचाल:

अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजला कर्जमुक्त करण्याचा ठरविले आहे. सध्या कंपनीवर सुमारे एक लाख कोटींहून अधिक कर्ज आहे. अंबानींनी रिलायन्समध्ये धोरणात्मक गुंतवणूकदारांना संधी देऊन या वर्षाच्या अखेरपर्यंतच कंपनीला कर्जमुक्त करणार असल्याची घोषणा केली आहे. मार्च 2021 पर्यंत कर्जमुक्त करण्याचा संकल्प अंबानी यांनी ऑगस्टमध्ये झालेल्या शेअरधारकांच्या बैठकीत केला होता.

सिल्व्हर लेकची जगभरातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक:

सिल्व्हर लेक या अमेरिकी कंपनीची40अब्जडॉलर्सपेक्षाअधिक उलाढाल आहे.शिवाय सिल्व्हर लेकने एअरबीनबी,अलिबाबा,अँटफायनान्शियल,अल्फाबेट्सटूअर आणि वेमो युनिट्स, डेल टेक्नॉलॉजीज,ट्विटर यासारख्या आघाडीच्या
कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलीआहे.

रिलायन्स समूहात परदेशी कंपन्यांनी केलेली गुंतवणूक

सौदी अरॅमको :53 हजार 125 कोटी रुपये

फेसबुक: 43 हजार 574 कोटी रुपये

सिल्व्हर लेक: 5 हजार 655 कोटी रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com