'चांदी' झाली 20 हजारांनी स्वस्त

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 30 November 2020

कोरोनामुळे जगभरातील बाजार पडला असताना बरेच गुंतवणुकदार सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी पर्याय शोधत होते.​

नवी दिल्ली: कोरोनामुळे जगभरातील बाजार पडला असताना बरेच गुंतवणुकदार सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी पर्याय शोधत होते. यामुळे बऱ्याच जणांनी सोने, चांदीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. कोरोनाकाळात ऑगस्ट महिन्यात या किंमती ऐतिहासिक वाढल्या होत्या. सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमला 56 हजारांच्या वर गेल्या होत्या तर चांदी प्रतिकिलोला 79 हजारांच्या जवळ गेली होती.

ऑगस्ट महिन्यात चांदी 79 हजारांच्या जवळ-
7 ऑगस्टला चांदीने रेकॉर्ड ब्रेक दर गाठले होते. प्रतिकिलोला चांदीचा भाव 79 हजार 723 पर्यंत (Silver all time high) पोहचला होता. पण सत्राच्या शेवटी दर 76 हजार 255 वर बाजार बंद झाला होता. यानंतर चांदीच्या दरात मोठी घसरण होताना दिसली आहे. या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात चांदीचे दर 59 हजार 100 रुपयांवर बंद झाले होते, म्हणजे मागील साडे तीन महिन्यांत चांदी 20 हजार 600 रुपयांनी उतरली आहे.

1 डिसेंबरपासून देशात होणार 5 महत्वपूर्ण बदल; ज्याचा परिणाम थेट सामान्यांवर
 
59 हजारांपर्यंत उतरली चांदी-
डिसेंबरमध्ये डिलिवरी होणाऱ्या चांदीची किंमत 773 रुपयांनी कमी होऊन 59 हजार 100 रुपयांपर्यंत आले होते. तसेच मार्चमधील डिलिवरीच्या चांदीच्या किंमती 1290 रुपयांनी उतरुण 60 हजार 333 रुपयांवर बंद झाले होते. 

राजधानी दिल्लीमध्ये शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याचे दर 43 रुपयांनी कमी होऊन 48 हजार 142 रुपये झाले आहेत. याआधी गुरुवारी हाच दर 48 हजार 185 इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याचा दर 1810 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे.

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था येतेय रुळावर

एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील सराफ बाजारात चांदी 36 रुपयांनी स्वस्त झाली आहे. चांदीचे प्रति किलोग्रॅम दर 59 हजार 250 रुपये इतके असून सोमवारी हाच दर 59 हजार 286 रुपये इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे प्रति औंस दर 23.29 डॉलर इतके आहेत.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: silver prices increases by 20 thousand rupees from august