RBI गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था येतेय रुळावर

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 26 November 2020

रिझर्व्ह बँकेच्या नियामक सुधारणांमुळे वित्तीय बाजारांनी नवा उच्चांक गाठला असल्याची माहितीही शक्तिकांत दास यांनी दिली आहे.

नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त दराने रुळावर येत असल्याचा दावा भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikantha Das) यांनी केला आहे. गुरुवारी फॉरेन एक्स्चेंज डीलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (FEDAI) व्हर्च्युअल वार्षिक कार्यक्रमाला संबोधित करताना शक्तिकांत दास बोलत होते.

जर अर्थव्यवस्थेची वाढ कायम ठेवायची असेल तर सणासुदीचा हंगाम संपल्यानंतरही उत्पादने आणि सेवांची मागणी कायम ठेवण्याची गरज असल्याचेही दास यांनी मत मांडले आहे.

अमेरिकेची अर्थव्यवस्था येतेय रुळावर; जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत

वाढत्या कोरोना रुग्णांचा आकडा हा सुधारत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी नुकसानकारक असून त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर मागणी वाढणे गरजेचे आहे, असंही दास म्हणाले. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये 23.9 टक्के घट झाल्यानंतर आता भारतीय अर्थव्यवस्थेत मजबूत सुधारणा झाली आहे.

काउंटरवर बुक केलेलं तिकीटही करता येणार रद्द

आता अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत आहे. ही गती टिकवण्याची गरज आहे. 2021 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 9.5 टक्क्यांनी घसरेल, असा अंदाज आरबीआयने वर्तवला आहे. 

अर्थव्यवस्थेला धोका कायम-
रिझर्व्ह बँकेच्या नियामक सुधारणांमुळे वित्तीय बाजारांनी नवा उच्चांक गाठला असल्याची माहितीही शक्तिकांत दास यांनी दिली आहे. दास म्हणाले की, भारताचा आर्थिक विकासाचा दृष्टिकोन सुधारला आहे, पण युरोप आणि भारताच्या काही भागात कोरोनाच्या साथीचा पुन्हा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे.

(edited by- pramod sarawalw


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shaktikantha das indian economy showed stronger than expected pace of recovery