चांदीने गाठला ऐतिहासिक उच्चांक

पीटीआय
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

सराफा बाजारात चांदीचा भाव (प्रतिकिलो) मंगळवारी तब्बल 2 हजार रुपयांनी वधारून 45 हजार रुपये या सार्वकालीन उच्चांकावर पोचला आहे. 

नवी दिल्ली ः गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या जोरदार खरेदीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीचा भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. येथील सराफा बाजारात चांदीचा भाव (प्रतिकिलो) मंगळवारी तब्बल 2 हजार रुपयांनी वधारून 45 हजार रुपये या सार्वकालीन उच्चांकावर पोचला आहे.  

सोन्याचा भाव ऐतिहासिक पातळीवर पोचल्यानंतर त्यापाठोपाठ चांदीच्या भावातही लक्षणीयरीत्या वाढ होत आहे. चांदीचा भाव उच्चांकावर पोचला असतानाच आज सोन्याच्या भावात 100 रुपयांनी घसरला. त्यामुळे शुद्ध व स्टॅंडर्ड सोन्याचा भाव (दहा ग्रॅम) अनुक्रमे ऑल इंडिया सराफा असोसिएशनने 38,370 व 38,200 रुपयांवर आल्याची माहिती ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रतिऔंस 1520 डॉलर, तर चांदीचा भाव प्रतिऔंस 17.32 डॉलरवर होता. 

अर्थव्यवस्थेतील मरगळ तसेच भांडवली बाजारांत सातत्याने सुरू असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून मौल्यवान धातूंच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे. परिणामी, सोने-चांदी भावात वाढ होत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Silver touches all time high mark of Rs 45000