मुलीच्या ऍडमिशनसाठी त्याने चक्क मोजले 45 कोटी रुपये !

वृत्तसंस्था
Saturday, 4 May 2019

वॉशिंग्टन: आपल्या मुलाने किंवा मुलीने चांगल्या कॉलेज किंवा विद्यापीठामधून शिक्षण घ्यावे असे सगळ्याच पालकांना वाटत असते. त्यासाठी साम, दाम.. असे सगळे काही करण्याची त्यांची तयारी असते. डोनेशन किंवा देणगी हा त्याचा मुख्य भाग. अगदी आपल्या मुलाला अमुकच एका शाळेत बालवाडीमध्ये ( नर्सरी, केजी)  प्रवेश मिळावा म्हणून आई-वडील पहाटे प्रसंगी रात्रीपासूनच रांग लावून शाळेबाहेर उभा असल्याचे चित्र आपण पुणे सारख्या ठिकाणी पहिले आहे. महत्वाचे म्हणजे या रांगेत सर्वसामान्य घरातील पालक उभे असतात. मात्र, जर मुलगी एका अब्जाधीश उद्योगपतींची असेल तर? 

शेनडोंग बुचंग ही चीनमधील प्रसिद्ध फार्मा कंपनी. झाओ ताओ हे त्या कंपनीचे मालक. 'युसी' या आपल्या लाडक्या मुलीला स्टॅनफोर्ड या जगप्रसिद्ध विद्यापीठात प्रवेश मिळावा म्हणून त्यांची वाट्टेल ती रक्कम देण्याची तयारी होती. त्यासाठी त्यांनी विद्यापीठात प्रवेश मिळवून देणाऱ्या विल्यम रिक सिंगर नावाच्या दलाला संपर्क साधला आणि त्याने तब्बल 45 कोटी रुपये उकळले. तेही ही रक्कम गरजूंना देण्यात येते असे सांगून. मात्र प्रकरण उघडकीस आले आणि अमेरिकेतील शिक्षण क्षेत्रातील सगळ्यात मोठे स्कॅम समोर आले. या प्रकरणी अमेरिकी गुन्हे चौकशी विभाग अर्थात एफबीआईने 50 लोकांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Singaporean billionaire ensnared in US college admissions scandal