अल्पबचतीवरील व्याजदर केंद्र सरकारकडून ‘जैसे थे’

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जुलै 2018

नवी दिल्ली - केंद्र सरकारने टपाल खात्यातील विविध गुंतवणूक योजना, किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी आदी अल्पबचत योजनांवरील व्याजदर कायम ठेवले आहेत. १ जुलैपासून अल्पबचतीचे सुधारित व्याजदर लागू झाले. मात्र, सलग दुसऱ्या तिमाहीत कोणतीही वाढ न झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण आहे.

सरकारी रोखे आणि बाँडप्रमाणे गुंतवणूक योजनांचे व्याजदर बाजाराशी सुसंगत ठेवण्याच्यादृष्टीने सरकारकडून अल्पबचतीच्या व्याजदराचा तिमाही आढावा घेतला जातो. बचत ठेवींवर ४ टक्के, पाच वर्षांची आर्वत ठेव ६.९ टक्के, पाच वर्षे मुदतीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी ८.३ टक्के, राष्ट्रीय बचत पत्र ७.६ टक्के, पाच वर्षांची मासिक उत्पन्न योजना ७.३ टक्के, भविष्य निर्वाह निधीवरील (पीपीएफ) ठेवींवर ७.६ टक्के व्याजदर कायम आहे. किसान विकास पत्रामधील गुंतवणुकीवर ७.३ टक्के व्याज मिळेल. मुलींच्या भविष्यासाठीची तरतूद असणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेतील ८.१ टक्के व्याजदर कायम आहे. ३० सप्टेंबरपर्यंत हे व्याजदर कायम राहणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: small saving interest rate central government