सतरा वर्षात 'या' बँकेचा शेअर तब्बल एक लाख टक्क्यांनी वधारला

South African bank stock to increase 144,000 per cent in less than two decades
South African bank stock to increase 144,000 per cent in less than two decades

मुंबई: कर्ज देताना कागदपत्रांची पूर्तता होत नसेल तर अनेक बँका जोखीम नको म्हणून ग्राहकांना कर्ज देण्यास मनाई करतात. मात्र, कर्ज म्हटल्यावर जोखीम पत्करावीच लागते. तसेच कर्ज घेतल्यावर परतफेड करायची नाही अशी मानसिकता असणारे सर्वसामान्य ग्राहक खूप कमी असतात. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन ज्या ग्राहकांना इतर प्रमुख बँकांनी कर्ज देण्यास नकार दिला आहे अशा ग्राहकांना कर्ज वाटप करण्याचे धोरण दक्षिण आफ्रिकेच्या कॅपिटेक बँकेने अवलंबले. परिणामी आज बँकेचा व्यवसाय लाखो टक्क्यांच्या पटीत वाढला आहे.

2001 साली या बॅंकेची स्थापना झाली होती. त्यानंतर 2002 साली कंपनीचा शेअर दक्षिण आफ्रिकी शेअर बाजारात 1 रँड (रँड हे आफ्रिकी चलन आहे) वर व्यवहार करत होता. गेल्या सतरा वर्षांचा विचार करता आज कंपनीचा शेअर 1440 रँडवर व्यवहार करत आहे. म्हणजेच सतरा वर्षात गुंतवणूकदारांची गुंतवणूक तब्बल 1.4 लाख टक्कयांनी वाढली आहे. तुलनेत जोहान्सबर्गचा बेंचमार्क निर्देशांक फक्त 424 टक्यांनी वाढला आहे. तर, देशातील इतर चार प्रमुख बँकांनी 146 ते 581 टक्क्यांच्या पटीत वाढ दिली आहे.

छोट्या ग्राहकांचे महत्व अचूक ओळखलेल्या कॅपिटेक बँकेकडे सप्टेंबर अखेर 1 कोटी 26 लाख ग्राहक होते. तर प्रत्येक महिन्याला तब्बल 2 लाख नवीन ग्राहक जोडले जात आहेत. (1 रँड = 4.90 रुपये.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com