esakal | वर्षाबभरात होईल बक्कळ कमाई, तज्ज्ञांनी सुचवलेत हे केमिकल कंपन्यांचे शेअर्स
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

वर्षाभरात होईल बक्कळ कमाई, तज्ज्ञांनी सुचवलेत हे केमिकल कंपन्यांचे शेअर्स

sakal_logo
By
सुमित बागुल

मागच्या वर्षभरापासून केमिकल सेक्टरमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बीएसईमध्ये समाविष्ट 23 स्टॉक्स एका वर्षात मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले. या स्टॉक्सने गुंतवणूकदारांची संपत्ती चक्क दुप्पट केली आहे. तुमचा विश्वास नाही बसणार पण त्यापैकी 6 स्टॉक्स असे आहेत ज्यात 300-500 टक्के वाढ झाली आहे. आम्ही आजच्या या विश्लेषणात फक्त अशा कंपन्यांचा समावेश केला आहे ज्यांचे मार्केट कॅप 1000 कोटी आहे. (specialty chemical stocks suggested by share market leaders)

हेही वाचा: SBI चे शेअर्स आता खरेदी करणे योग्य की अयोग्य ?

केमिकल सेक्टरमध्ये specialty chemicals सेक्टरचे स्टॉक्स असे आहेत की त्यात 40 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे हे ध्यानात घेण्यासारखे आहे. आमच्या 23 केमिकल स्टॉक्सच्या यादीमध्ये या 7 specialty chemicals कंपन्यांचा पूर्णपणे समावेश नाही. रिसर्च फर्म जेएम फायनान्शियल 7 पैकी 4 वर तेजीमध्ये आहे.

भारतातील specialty chemicals इंडस्ट्रीजमध्ये वाढ होण्याची प्रचंड क्षमता असल्याचे जेएम फायनान्शियलने आपल्या रिसर्च रिपोर्टमध्ये म्हटले आहे . specialty chemicals स्टॉक्स आतापर्यंत बरीच वाढ झाली असली तरी अद्यापही त्यामध्ये गुंतवणूकीच्या संधी आहेत.
जेएम फायनान्शियलच्या टॉप पिक्समध्ये Navin Fluorine आणि PI Industries यांचा समावेश आहे. याशिवाय, UPL देखील त्यांचा आवडता स्टॉक आहे. जेएम फायनान्शियलच्या SRF वर डोळे झाकून विश्वास ठेवण्याचा सल्लाही दिला आहे.

हेही वाचा: ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आहे पैसे कमावण्याची संधी, जाणून घ्या शेअर्स आणि टार्गेट्स

जेएम फायनान्शियलचे टॉप पिक्स

Navin Fluorine International - या स्टॉकवर जेएम फायनान्शियलने खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकिंग हाऊसने यासाठी 4,240 रुपयांचे टारगेट दिले आहे. मागच्या एका वर्षांत या शेअरमध्ये 121 टक्क्यांची वाढ बघायला मिळाली आहे.

SRF - मागच्या एका वर्षात या शेअरने कमाल केली आहे, हा शेअर तब्बल 96 टक्के तेजीत होता. जेएम फायनान्शियलने या शेअरला Buy रेटिंग देत यासाठी 8,375 रुपयांचे टारगेट दिले आहे.

हेही वाचा: या शेअरमध्ये आहे पैसे दुप्पट करण्याची क्षमता, जाणून घ्या कोणता आहे हा शेअर

PI Industries - मागच्या एका वर्षात हा शेअर 82 टक्के तेजीत होता. जेएम फायनान्शियलने या शेअरला Buy रेटिंग देत यासाठी 3380 रुपयांचे टारगेट दिले आहे.

UPL - मागच्या एका वर्षात हा शेअर 76 टक्के तेजीत होता. जेएम फाइनान्शियलने या शेअरला Buy रेटिंग देत यासाठी 1020 रुपयांचे टारगेट दिले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image