लॉकडाऊनमुळे महसूल घटल्यामुळे स्टार्टअप 'व्हेंटिलेटर'वर

पीटीआय
Tuesday, 19 May 2020

कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था मंदीत मार्गक्रमण करते आहे. मंदीच्या वातावरणामुळे अनेक स्टार्ट अप उद्योग टिकून राहण्यासाठी झटत आहेत, असे स्टार्टअप नॅसकॉमच्या अहवालातून पुढे  आले आहे. तर बहुतांश स्टार्टअप 'व्हेंटिलेटर'वर आहेत. नॅसकॉमने देशातील स्टार्टअपचा अभ्यास केला आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था मंदीत मार्गक्रमण करते आहे. मंदीच्या वातावरणामुळे अनेक स्टार्ट अप उद्योग टिकून राहण्यासाठी झटत आहेत, असे स्टार्टअप नॅसकॉमच्या अहवालातून पुढे  आले आहे. तर बहुतांश स्टार्टअप 'व्हेंटिलेटर'वर आहेत. नॅसकॉमने देशातील स्टार्टअपचा अभ्यास केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेले पाच दिवस विविध क्षेत्रासाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले आहेत. यामध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी देखील विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र स्टार्टअप उद्योगांना सावरण्यासाठी बराच अवधी लागणार आहे, असे नॅसकॉमच्या अहवालात म्हटले आहे. 

लॉकडाऊन काळात वेतन देणे, आता कंपन्यांवर नाही बंधनकारक

भारतात 9 हजार 300 तंत्रज्ञान आधारित स्टार्टअप आहेत. भारत जगातील तिसरे सगळ्यात मोठे स्टार्टअप हब आहे. सुमारे 4 लाख लोकांना यातून रोजगार  प्राप्त होतो. कोविडमुळे मागणी आणि पुरवठा विस्कळीत झाला आहे. सर्वप्रकारच्या स्टार्टअपला फटका बसला आहे. झोमॅटो, स्विगी, ओला, पेटीएम आणि ओयोसारख्या अनेक स्टार्टअपने कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात केली आहे. 

स्टार्टअपची सध्याची अवस्था -
भारतात एप्रिलमध्ये 250 स्टार्टअपचा 90 टक्के महसूल कमी झाला आहे.
- 40 टक्के स्टार्टअपने व्यवसाय बंद केला आहे.
-92 टक्के स्टार्टअपचा महसुल घटला आहे.
- 62 टक्के स्टार्टअपच्या महसुलात 40 टक्के घसरण 
-34 टक्के स्टार्टअपच्या महसुलात 80 टक्के घसरण 
- 70 टक्के स्टार्टअप फक्त 0-3 महिने तग धरू शकतात.

स्टार्टअप उद्योगांना थेट मदत मिळाल्या शिवाय त्या तग धरू शकत नाहीत.

कर्जदारांना पुन्हा दिलासा शक्य; 'ईएमआय' स्थगितीचा कालावधी वाढण्याची शक्यता

मार्केटिंग खर्च आणि पगार  कपात -
स्टार्टअपने तग धरून राहण्यासाठी मार्केटिंगच्या खर्चात कपातीचा मार्ग स्वीकारला आहे. 70 टक्के बी2बी स्टार्टअपने खर्चात कपात केली आहे. तर 53 टक्के स्टार्टअपने कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली आहे. तर 13 टक्के स्टार्टअपने कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. 

निधीची टंचाई आणि वाढ खुंटली
कोरोनामुळे सगळीकडे मागणी कमी झाल्यामुळे स्टार्टअपचा महसूल घटला आहे. त्यामुळे बहुतांश स्टार्टअपची वाढ खुंटली असून नव्याने निधी उभारणीस देखील अडचणी येत आहे.

मोठ्या स्टार्टअपला किमान 8 महिने मंदीचा प्रभाव जाणवणार आहे. मात्र, नव्याने सुरू झालेल्या स्टार्टअपला दीर्घकाळ याचे परिणाम जाणवणार आहेत.

फिनटेक, हेल्थ टेक स्टार्टअप कंपन्यांवर 9 ते 10 महिने कोरोनाचा परिणाम राहील. मात्र रिटेल, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रॅव्हल-ट्रान्सपोर्ट मात्र सावरण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागेल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा ऍनालिटिक्स स्टार्टअपमध्ये मात्र या काळात चांगली वाढ होईल.

नॅसकॉमच्या स्टार्टअपसाठी मागण्या
नॅसकॉमने स्टार्टअपसाठी केंद्र सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत.
- स्टार्टअप कंपन्यांना सरकारकडून थेट निधी प्राप्त व्हावा
-लोकल मॅन्युफॅक्चरिंग आणि  विकास कार्यक्रम राबवणे आवश्यक
-वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) कपात आणि स्टार्ट अपसाठी टॅक्स रिफंड प्रक्रिया जलद करणे आवश्यक

मागणी घटल्याने महसुलात घट
* 40 टक्के स्टार्टअपने व्यवसाय बंद केला 
* नॅसकॉमच्या स्टार्टअपसाठी मागण्या
* नॅसकॉमने स्टार्टअपसाठी केंद्र सरकारकडे विविध मागण्या केल्या 
* स्टार्टअप कंपन्यांना सरकारकडून थेट निधी प्राप्त व्हावा
* - 70 टक्के स्टार्टअप फक्त 0-3 महिने तग धरू शकतात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Start ups in critical condition faces revenue loss