'इकोझेन', शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी शेतमाल साठवणुकीचा शाश्वत पर्याय

'इकोझेन', शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी शेतमाल साठवणुकीचा शाश्वत पर्याय
Summary

शेतमाल बाजारात नेण्याचे आणि योग्य भावात विक्री करण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रियेकडे तितके लक्ष दिले गेलेले नाही. एकीकडे दलालांची साखळी आणि दुसरीकडे शेतमाल साठवणुकीसाठी अपुरी साधने अशा कात्रीत शेतकरी अडकतो.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी काम करताना बऱ्याचदा पीक, बियाणे, खते याविषयी अधिक बोलले जाते किंवा त्यासंबंधी यंत्रे, उत्पादनांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते. मात्र, शेतमाल बाजारात नेण्याचे आणि योग्य भावात विक्री करण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रियेकडे तितके लक्ष दिले गेलेले नाही. एकीकडे दलालांची साखळी आणि दुसरीकडे शेतमाल साठवणुकीसाठी अपुरी साधने अशा कात्रीत शेतकरी अडकतो. ही समस्या सोडविण्यासाठी इकोझेन सोल्यूशन्स या पुणे-स्थित कृषी-तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप कंपनीने पुढाकार घेतला आहे.

आयआयटी खरगपूरमध्ये शिक्षण घेतलेल्या देवेंद्र गुप्ता, प्रतीक सिंघल आणि विवेक पांडे या तीन तरुणांनी ही स्टार्टअप कंपनी स्थापन केली आहे. नाशवंत स्वरुपाच्या शेतमालासाठी पूरक अशी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना सौर-ऊर्जा आधारित, परवडणाऱ्या दरामध्ये कोल्ड-स्टोअरेज (शेतमाल साठवणुकीसाठी तापमान-नियंत्रित गोदाम) सुविधा तसेच सिंचनासाठी सौर-ऊर्जा आधारित मोटरपंप नियंत्रक उपकरणे त्यांनी विकसित केले आहेत.

देवेंद्र आणि प्रतीक यांची ओळख २००६ मध्ये आयआयटी खरगपूरच्या हाॅस्टेलमध्ये (हाॅल आॅफ रेसिडन्स) योगायोगाने झाली. त्यांच्या एका मित्रामार्फत विवेक यांच्याशी परिचय झाला. शिक्षण घेताना प्रशिक्षणार्थी विद्यार्थी म्हणून देवेंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ऊर्जा निर्मिती व नियंत्रणासाठीचे उपकरण बनविले होते. त्यानंतर त्यांनी आयआयएससी बंगळूर, सिमेन्स, बूर्ज खलिफा आदी ठिकाणी इंटर्न म्हणून काम केले. देवेंद्र गुप्ता म्हणाले, "शिक्षण घेत असताना विकसित केलेले उपकरण तसेच इंटर्नशीपमध्ये आलेल्या अनुभवामुळे आम्ही विचार करू लागलो की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे. ऊर्जा क्षेत्रातच काम करायचे तसेच परवडणारी, सर्वांना सहजरित्या उपलब्ध होईल आणि कार्यक्षम पद्धतीने काम करेल असे ऊर्जा निर्मिती व नियंत्रण उपकरण बनविण्याचे आम्ही २००९ मध्ये आयआयटीमध्ये शिक्षण सुरू असतानाच ठरविले."

'इकोझेन', शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी शेतमाल साठवणुकीचा शाश्वत पर्याय
चलनवाढीला ‘ब्रेक’, उत्पादनाला गती

"अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला अनेक बड्या भारतीय तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून नोकरीच्या आॅफर आल्या. त्याच दरम्यान आम्ही काही शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्या शेतकऱ्यांकडे पाणी, कसदार जमीन अशी संसाधने होती मात्र सिंचनासाठी त्यांना पावसावर अवलंबून राहावे लागत होते. सिंचनासाठी शाश्वत पर्याय मिळाल्यास त्यांना पाहिजे तसे पीक घेता आले असते. शेतकऱ्यांची ही समस्या समजल्यानंतर आम्ही इकोट्राॅन हे सौर-ऊर्जा आधारित व पंप नियंत्रक उपकरण विकसित केले," असे देवेंद्र यांनी सांगितले.

वीज पुरवठा नसला तरीही कार्यरत राहणारा तसेच दूर अंतरावरूनही चालू-बंद होऊ शकेल असे हे पंप नियंत्रक उपकरण होते. कृषी क्षेत्रात काम करणे सोपे नाही याची जाणीव देवेंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांना काही दिवसातच झाली. "पंप नियंत्रक उपकरण शेतकऱ्यांना उपयुक्त होते, मात्र त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न पुरेशा प्रमाणात वाढत नव्हते. त्यावेळी लक्षात आले की शेतमालाच्या साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना पुरेशा सुविधा नाहीत आणि असल्यास त्या खूप खर्चिक आहेत. त्यामुळे आम्ही त्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी काम सुरू केले. त्यातून इकोफ्राॅस्ट या कोल्ड-स्टोअरेज प्रोडक्टचा जन्म झाला," असे देवेंद्र यांनी सांगितले.

'इकोझेन', शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी शेतमाल साठवणुकीचा शाश्वत पर्याय
मेस्सीने लावला क्रिप्टो करन्सीवर दाव; चर्चा तर होणारच!

कोणत्याही बॅकअपशिवाय, तापमान (विशेषतः किमान तापमान) नियंत्रित करू शकेल असे उष्मा ऊर्जा आधारित तसेच सौर-ऊर्जेवर चालणारे आणि कोठेही नेता येईल असे इकोफ्राॅस्ट हे उत्पादन आहे. इकोफ्राॅस्ट आणि इकोट्राॅन ही दोन्ही उत्पादने इंटरनेटला जोडलेली आहेत आणि त्यामुळे त्यांच्या वापराविषयी तसेच कार्यक्षमतेविषयीची सर्व माहिती (डेटा) प्राप्त होतो. या माहितीच्या आधारे नाशवंत-शेतमालासाठी पूरक बाजारपेठ निर्माण करण्याचा प्रयत्न इकोझेन स्टार्टअप करीत आहे. ही बाजारपेठ म्हणजे इको-कनेक्ट हा प्लॅटफाॅर्म.

देवेंद्र म्हणाले, "इको-कनेक्ट हा मोबाईल आणि वेब-आधारित प्लॅटफाॅर्म आहे. ग्राहकांपर्यंत संघटितरित्या पोचण्यासाठी आणि शेतमालाची विक्री योग्य भावात करण्यासाठी हा प्लॅटफाॅर्म शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. विशेषतः कोव्हिड-१९ महामारीच्या काळात बाजारपेठा चालू-बंद होत्या. अशावेळी संघटित-स्वरुपात ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी इकोकनेक्टने शेतकऱ्यांना मदत केली. केवळ नजिकच्या बाजारपेठेपुरते मर्यादित न राहता दूरवरच्या बाजारपेठेत आणि रास्त भावात आपल्या शेतमाल विकण्याची संधी शेतकऱ्यांना या निमित्ताने मिळाली."

'इकोझेन', शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी शेतमाल साठवणुकीचा शाश्वत पर्याय
क्रिप्टो जगतातील आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी, कंपनीकडून हॅकर्सना खुलं पत्र

देशभरात इकोझेनचे ५० हजाराहून अधिक ग्राहक आहेत. या स्टार्टअप कंपनीमध्ये कॅस्पियन, जेन-नेक्स्ट व्हेन्चर्स, ओम्नीवोर, सदगुरू कॅटलायझर अॅडव्हायझर्स, हिवोस आदी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत एकूण ४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. नजिकच्या भविष्यात ७५ ते ८० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविण्यासाठी स्टार्टअपचे संस्थापक प्रयत्नशील आहेत. तसेच फिलिपिन्स, म्यानमार, केन्या, घाना आदी देशांमध्ये उत्पादनांची विक्री करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

इकोझेनची कार्यपद्धती

- वीजजोड मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मिळविली जाते

- व्हाॅट्सअॅप मार्केटिंग तसेच काॅलिंगच्या माध्यमातून संपर्क साधला जातो

- इकोझेनचा प्रतिनिधी इच्छूक शेतकऱ्यांची भेट घेतो

- वितरकांमार्फत उत्पादनांचे इन्स्टाॅलेशन करण्याचा किंवा उपकरणे भाडेतत्त्वावर घेण्याचा पर्याय उपलब्ध

- मासिक भाडे (पाच ते २५ हजार रुपये) किंवा प्रतिकिलो एक ते दोन रुपये या दराने उपकरणे व सुविधा घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांना दिला गेला आहे.

- पीएम-कुसूम योजनेचा लाभ घेतल्यास, शेतामध्ये सौर-ऊर्जा आधारित पंप बसविल्यास ६० टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळू शकते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com