ग्रामीण भागात 'व्हर्च्युअल कार्डिओलाॅजी' सेवा देणारी ट्रायकाॅग

ग्रामीण भागात 'व्हर्च्युअल कार्डिओलाॅजी' सेवा देणारी ट्रायकाॅग
Summary

आरोग्य व रुग्णसेवा क्षेत्रातील ही उणिव लक्षात घेऊन चार तरुणांनी २०१४ मध्ये जगातील सर्वात मोठी प्रेडिक्टिव्ह हेल्थकेअर अॅनॅलिटिक्स कंपनी स्थापन करण्याचा निश्चय केला.

ह्रदयाशी संबंधित आजारांमुळे, विशेषतः ह्रदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरी भागात काही प्रमाणात रुग्णसेवा चांगल्या दर्जाची असली तरी निमशहरी किंवा ग्रामीण भागात मात्र ती तशी नाही. त्यामुळे अशा भागातील रुग्णांना योग्य वेळेत निदान आणि पुढील उपचार मिळणे कठीण जाते. आरोग्य व रुग्णसेवा क्षेत्रातील ही उणिव लक्षात घेऊन चार तरुणांनी २०१४ मध्ये जगातील सर्वात मोठी प्रेडिक्टिव्ह हेल्थकेअर अॅनॅलिटिक्स कंपनी स्थापन करण्याचा निश्चय केला.

डाॅ चरित भोगराज, डाॅ झैनुल चरबीवाला, डाॅ उदयन दासगुप्ता आणि अभिनव गुज्जर ही त्यांची नावे. कोव्हिड-१९ महामारीच्या उद्रेक होण्यापूर्वी म्हणजे मार्च २०२० मध्ये या चौघांनी बंगळूर शहरात स्थापन केलेल्या ट्रायकाॅग स्टार्टअपला सुमारे ८० कोटी रुपयांचे फंडिंग मिळाले. त्यापूर्वी म्हणजे २०१८ मध्ये या स्टार्टअपला सुमारे ५० कोटी रुपयांचे फंडिंग मिळाले होते.
डाॅ चरित हे इंटरव्हेन्शनल कार्डिओलाॅजिस्ट आहेत, तसेच या स्टार्टअपचे मुख्य कार्यकारी अधिकारीसुद्धा. ह्रदयविकारांचे प्राथमिक निदान होण्यातील विलंबामुळे निर्माण होणाऱ्या वैद्यकीय तसेच अन्य समस्या डाॅ चरित यांच्या लक्षात आल्या. हा विलंब टाळण्यासाठी त्यांना इन्स्टा-ईसीजी ही संकल्पना सुचली. म्हणजे, ग्रामीण भागातील कोणत्याही छोट्या दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात जर रुग्ण पोचला तर त्याचा ईसीजी (इलेक्ट्रो कार्डियोग्राम - म्हणजेच ह्रदयाच्या स्पंदनाची माहिती देणारी चाचणी) घेऊन त्याला तत्काळ उपचार मिळण्यासाठी त्यांनी यंत्रणा विकसित केली.

इन्स्टा-ईसीजी कसे काम करते

ईसीजी घेण्यासाठीचे उपकरण ट्रायकाॅग उपलब्ध करून देते. या उपकरणाद्वारे घेण्यात आलेल्या चाचण्यांची माहिती क्लाऊड सर्व्हरवर अपलोड केली जाते. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ताेचा (आर्टिफिशियल इंटलिजन्स) वापर करून त्या माहितीचे वैद्यकीय विश्लेषण केले जाते.

ग्रामीण भागात 'व्हर्च्युअल कार्डिओलाॅजी' सेवा देणारी ट्रायकाॅग
SBI Platinum की, HDFC Green Deposit; कोणती गुंतवणूक फायदेशीर?

हे विश्लेषण योग्य आहे का, त्यामध्ये काही तांत्रिक दोष आहेत किंवा नाही याची खातरजमा ट्रायकाॅगच्या कार्यालयातील काही वैद्यकीय अधिकारी करतात. त्यानंतर त्या ईसीजीची माहिती व निदान संबंधित दवाखान्यात, प्राथमिक उपचार केंद्रात किंवा रुग्णालयातील डाॅक्टरकडे पाठविले जाते. ही सर्व प्रक्रिया दहा मिनिटांत केली जाते. त्यामुळे पुढील उपचाराची दिशा ठरविणे ग्रामीण भागातील डाॅक्टरांना सोपे जाते.

केवळ एवढेच नाही, तर रुग्णाला उपचारासाठी अन्य ठिकाणी नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था तसेच अन्य मोठ्या वैद्यकीय सुविधा केंद्रात किंवा हाॅस्पिटलमध्ये त्याची व्यवस्था करून देण्याचे कामही ट्रायकाॅगमार्फत केले जाते.

एआयची कमाल

एखाद्या मोठ्या हाॅस्पिटलमध्ये असलेल्या जगविख्यात तज्ज्ञांच्या तोडीचे निदान करण्यासाठी तितक्याच मोठ्या प्रमाणात आणि उपयुक्त माहिती प्राप्त होणे गरजेचे असते. अशी माहिती उपलब्ध झाल्यास कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) आधारे ईसीजी इंटरप्रिटेशन चांगल्या पद्धतीने होऊ शकते.

ग्रामीण भागात 'व्हर्च्युअल कार्डिओलाॅजी' सेवा देणारी ट्रायकाॅग
टीसीएसचे भांडवली बाजारमूल्य साडेतेरा लाख कोटी रुपयांवर

सामान्यतः एका ईसीजीमध्ये २०० प्रकारच्या ह्रदयविकारांसंबंधी माहिती दडलेली असते. त्यामुळे या विकारांशी संबंधित सर्व प्रकारचे विश्लेषण संबंधित क्लिनिकल ग्रेड मशीनद्वारे होणे आवश्यक असते.

ट्रायकाॅगच्या एआय अल्गोरिदमच्या सहाय्याने ह्रदयाशी संबंधित सुमारे ५० प्रकारच्या विकारांचे निदान जलदगतीने होऊ शकते. निदान प्रक्रियेची अचूकता ही ९५ ते ९८ टक्के एवढी आहे. असे असले तरी अंतिम निदान व निर्णय हा कार्डिओलाॅजिस्टकडूनच घेतला जातो. एआय तंत्रज्ञानाचा उपयोग फक्त ही निर्णयप्रक्रिया जलद करण्यासाठी केला जातो. त्यामुळे एआय तंत्रज्ञान हे डाॅक्टरांना पर्याय म्हणून नाही तर त्यांचा सहाय्यक म्हणून कार्य करते, असे डाॅ चरित यांनी सांगितले.

गोव्यामध्ये अंमलबजावणी

कोव्हिड महामारीच्या सुमारे एक वर्ष आधी गोव्यात ट्रायकाॅगच्या मदतीने एसटीईएमआय म्हणजे एसटी - एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फार्क्शन) हा प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयांमध्ये १२ - लीड ईसीजी मशीन आणि ट्रायकाॅग कम्युनिकेटर डिव्हाईस बसविण्यात आले आहेत.

ग्रामीण भागात 'व्हर्च्युअल कार्डिओलाॅजी' सेवा देणारी ट्रायकाॅग
फ्लिपकार्ट होलसेल देत आहे 2 लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज

इन्स्टाईसीजी उपकरणाद्वारे मिळालेली माहिती गोवा मेडिकल काॅलेजमध्ये असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमपर्यंत पोचविली जाते आणि त्यानंतर त्या टीमकडून संबंधित डाॅक्टरांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन केले जाते.

जीई हेल्थकेअर इंडिया एडीसन स्टार्टअप अॅक्सलरेटरची भूमिका
कार्डिओलाॅजीसह आँकोलाॅजी, जिनाॅमिक्स आणि रिमोट पेशंट माॅनिटरिंग या क्षेत्रात डायग्नाॅस्टिक सोल्यूशन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन जीई हेल्थकेअरच्या इंडिया एडिसन स्टार्टअप अॅक्सलरेटरने यंदाच्या वर्षी सहा स्टार्टअप कंपन्यांची निवड केली आहे. त्यामध्ये ट्रायकाॅगचा समावेश झाला आहे.
ट्रायकाॅगचे उपाध्यक्ष शिखर श्रीवास्तव म्हणाले, "एडिसन उपक्रमात समावेश होणे हे कोणत्याही वैद्यकीय-स्टार्टअपच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. वैद्यकीय परिसंस्था आणि सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबर काम करण्याची संधी या उपक्रमामुळे आम्हाला मिळणार आहे. ट्रायकाॅगने आतापर्यंत जगभरातील लाखो रुग्णांचे जीव वाचविले आहे. जीई एडिसन प्रोग्रॅममुळे आम्हाला हे काम अधिक व्यापक स्वरुपात करता येईल."

विप्रो जीई हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक आणि जीई हेल्थकेअरचे भारत व दक्षिण आशिया विभागाचे अध्यक्ष डाॅ श्रावण सुब्रमण्यम म्हणाले, "एडिसन प्रोग्रॅममुळे नावीन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन मिळत आहे. यंदाच्या वर्षी निवड झालेल्या सहा स्टार्टअप्सने आर्टिफिशियल इंटलिजन्स आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून नावीन्यपूर्ण पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील या पर्यायांचा लाभ डाॅक्टर, क्लिनिशियन, रुग्णसेवा करणारे प्रोफेशनल्स आणि अंतिमतः रुग्णांना होणार आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com