स्टेट बँकेकडून मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात

वृत्तसंस्था
Wednesday, 27 May 2020

एसबीआयने चालू महिन्यात सलग दुसऱ्यांदा ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटामुळे बँकिंग व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे एसबीआयने खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई -  सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) मुदत ठेवींच्या (एफडी) व्याजदरात 0.40 टक्क्याची कपात केली आहे. याचा बँकेच्या कोट्यवधी ठेवीदारांना फटका बसणार आहे. बँकेने सर्वच मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात कपात केलीआहे. बुधवार (ता.27) नवे व्याजदर लागू झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एसबीआयने चालू महिन्यात सलग दुसऱ्यांदा ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटामुळे बँकिंग व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे एसबीआयने खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

दर कपात कशी?
 7 ते 45 दिवसांसाठीच्या ठेवींवरील व्याजदरात 0.40 टक्के कपात केली. तो 2.9 टक्क्यांवर आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता या कालावधीसाठी 3.4 टक्के व्याज मिळेल. 

 1 वर्ष ते 3 वर्ष कालावधीच्या मुदत ठेवींवर आता ठेवीदारांना 5.1 टक्के व्याज मिळेल. 

3 वर्ष ते 5 वर्ष मुदतीच्या ठेवीवर 5.3 टक्के व्याज मिळेल. 

5 वर्षांहून अधिक आणि 10 वर्षांहून कमी कालावधीच्या ठेवींवर 5.4 टक्के व्याज मिळणार आहे. 

व्याजदर कपातीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसणार आहे. बँकेत ठेवलेल्या ठेवींवर मिळणाऱ्या   व्याजावर बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचा मासिक खर्च भागवत असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Bank Of india cuts interest rates on term deposits