स्टेट बँकेत अकाउंट आहे? तर हे वाचाच!

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 मार्च 2020

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी बचत खात्यावर दर महिन्याला किमान शिल्लक रक्कम (मिनिमम बॅलन्स) ठेवण्याची अट शिथिल केली आहे. तसेच, बॅंकेने ग्राहकांसाठी ‘एसएमएस’चे शुल्कही माफ केले आहे. 

मुंबई : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी बचत खात्यावर दर महिन्याला किमान शिल्लक रक्कम (मिनिमम बॅलन्स) ठेवण्याची अट शिथिल केली आहे. तसेच, बॅंकेने ग्राहकांसाठी ‘एसएमएस’चे शुल्कही माफ केले आहे. 

देशभरातील बॅंकेच्या सर्व ४४.५१ कोटी बचत खात्यांसाठी बॅंकेने ही घोषणा  केली आहे. बॅंकेच्या बचत खातेधारकांना महानगर, निमशहरी आणि ग्रामीण भागात दर महिन्याला अनुक्रमे तीन हजार रुपये, दोन  हजार रुपये आणि एक हजार रुपयांची रक्कम खात्यामध्ये ठेवावी लागते. खातेधारकांनी दर महिन्याला किमान शिल्लक रक्कम बचत खात्यात न ठेवल्यास बॅंकेकडून ५ ते १५ रुपये अधिक कर असा दंड आकारला जातो. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बचत खात्यासाठी ३ टक्के व्याज
बॅंकेने बचत खात्यांसाठी वार्षिक ३ टक्के व्याजदर दिला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. बॅंकेत ३१ डिसेंबर २०१९ अखेर ३१ लाख कोटी रुपयांच्या ठेवी असून, बॅंकेच्या देशभरात २१ हजार ९५९ शाखा आहेत.

हेही वाचा : टीसीएसची पुन्हा आघाडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Bank of India removes minimum balance requirement

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: