esakal | टीसीएसची पुन्हा आघाडी 
sakal

बोलून बातमी शोधा

tcs

शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला मागे टाकत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आता सर्वाधिक बाजारभांडवलाची भारतीय कंपनी बनली आहे. 

टीसीएसची पुन्हा आघाडी 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई - शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला मागे टाकत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आता सर्वाधिक बाजारभांडवलाची भारतीय कंपनी बनली आहे. 

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या टीसीएसचे बाजारभांडवल 7 लाख 40 हजार 45 कोटी रुपये आहे. टीसीएसचा समभाग काल (ता. 9) सोमवारी 145 रुपयांच्या घसरणीसह 1 हजार 972 रुपयांवर स्थिरावला. शेअर बाजारातील पडझडीचा मोठा फटका रिलायन्स इंडस्ट्रीजला बसला. कंपनीचा समभाग 13.10 टक्‍क्‍यांच्या घसरणीसह 1 हजार 113 रुपयांवर बंद झाला. परिणामी रिलायन्सच्या बाजारभांडवलात मोठी घट झाली आणि सर्वाधिक बाजारभांडवलाची कंपनी हा किताब रिलायन्सने गमावला. रिलायन्सचे बाजारमूल्य 7 लाख 5 हजार 655 कोटी रुपयांवर आले आहे. 

हेही वाचा : तुमच्या संपत्तीत खरोखरच वाढ होतेय का?

रिलायन्सच्या समभागात 27 टक्के घट 
रिलायन्सच्या बाजारभांडवलाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 10 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. गेल्या दोन आठवड्यांमध्ये कंपनीच्या समभागांमध्ये 27 टक्‍क्‍यांची टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे. कोरोना विषाणूचा फैलाव आणि खनिज तेलाच्या भावातील मोठी घसरण याचा दुहेरी फटका रिलायन्सला बसला आहे. रिलायन्स खालोखाल एचडीएफसी बॅंक ही देशातील तिसऱ्या क्रमांकाचे बाजारभांडवल असलेली कंपनी बनली आहे. एचडीएफसी बॅंकेचे बाजारभांडवल 6.02 लाख कोटी रुपये आहे. हिंदुस्थान युनीलिव्हर 4.62 लाख कोटी रुपयांच्या बाजारभांडवलासह चौथ्या क्रमांकावर आहे. 

loading image