स्टेट बँकेतही ‘स्वेच्छा निवृत्ती’?

पीटीआय
Tuesday, 8 September 2020

बँकेत २५ वर्षांहून अधिक काळ सेवा केलेले किंवा वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेले कर्मचारी या योजनेसाठी पात्र असतील. एक डिसेंबर २०२० ते पुढील वर्षी फेब्रुवारी अखेरपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

नवी दिल्ली - खर्च आणि मनुष्यबळ यांचे योग्य व्यवस्थापन आणि ताळमेळ राखण्यासाठी स्वेच्छा निवृत्ती योजना लागू करण्याचा विचार भारतातील सर्वांत मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेत सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या योजनेसाठी किमान ३०,१९० कर्मचारी पात्र असल्याचे याबाबतच्या अहवालात म्हटले आहे.  

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कामात साचलेपणा आलेल्या, कार्यक्षमता कमी झालेल्या, खासगी अडचणी असलेल्या किंवा इतर नोकरी-व्यवसाय करू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मामाने निवृत्त होण्यासाठी बँकेच्या ‘सेकंड इंनिंग्ज टॅप व्हीआरएस -२०२०’ ही योजना लागू करण्याचा बँकेचा विचार असल्याचे ‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. बँकेत २५ वर्षांहून अधिक काळ सेवा केलेले किंवा वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेले कर्मचारी या योजनेसाठी पात्र असतील. एक डिसेंबर २०२० ते पुढील वर्षी फेब्रुवारी अखेरपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या पात्र कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, त्यांना त्यांच्या सेवा निवृत्तीपर्यंतचा काळ लक्षात घेऊन निम्म्या पगाराइतकी रक्कम दिली जाईल, असे सांगण्यात आले. याशिवाय, ग्रॅच्युइटी, निवृत्तिवेतन, पीएफ आणि वैद्यकीय फायदेही त्यांना नियमानुसार मिळतील. या योजनेसाठी बँकेचे ११,५६५ अधिकारी आणि १८,६२५ कर्मचारी पात्र आहेत. यापैकी ३० टक्के जणांनी जरी योजनेचा लाभ घेतला तरी बँकेचे २,१७० कोटी रुपये वाचणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state bank of india on voluntary retirement scheme 2020 for employee

Tags
टॉपिकस
Topic Tags: