SBI चा इशारा, या तारखेपर्यंत करा आधार-पॅन लिंक अन्यथा सेवा स्थगित

भारतीय स्टेट बॅंकेत आपले खाते असेल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे.
Adhar Pan card
Adhar Pan cardSakal News

नवी दिल्ली : बॅंकेच्या खातेधारकांना बॅंकेकडून नवीन नियमावली जाहीर होत असतात. तसेच आता भारतीय स्टेट बॅंकेने (SBI)आपल्या खातेधारकांसाठी नुकतीच नवीन नियमावली जाहीर केली आहे. यासाठी त्यांनी ग्राहकांसाठीच्या महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. पॅन कार्ड आणि आधार कार्ड (Pan Card And Aadhar Card) संदर्भात ह्या सूचना दिल्या आहेत. यानुसार ग्राहकांनी आपल्या खात्याला ३१ मार्च २०२२ पर्यंत संलग्न केले नाही तर आपले खाते स्थगित केले जाणार आहे असा इशारा बॅंकेने दिला आहे.

SBI ने आपल्या ट्वीटरवरुन ट्वीट करत सांगितले की, ग्राहकांनी सगळ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपल्या खात्याला आधार आणि पॅन कार्ड लिंक करायला पाहिजे. तसेच ''कोणत्याही प्रकारच्या अडचणींपासून सुटका मिळवण्यासाठी आणि चांगल्या सेवेसाठी ग्राहकांनी आपल्या खात्याला आधार आणि पॅन लिंक करावे.'' असं ट्वीट करत म्हटलं आहे.

Adhar Pan card
अमित शहांचे आता 'मिशन जाट'! UP निवडणुकीसंदर्भात ठरणार रणनीती

याअगोदर भारतातील मोठमोठ्या बॅंकेने खातेधारकांना आधार आणि पॅन लिंक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हे काम करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ह्यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. जर तुम्ही पॅन आणि आधार कार्ड लिंक नाही केले तर आपलं अकाऊंट स्थगित केलं जाऊ शकतं असा इशआरा बॅंकांनी दिला आहे.

जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या अकाउंटला पॅन आणि आधार लिंक केले नसेल तर आपण खाली दिलेल्या सूचनेनुसार आपल्या खात्याला ते लिंक करू शकता. लिंक करण्यासाठी आपण खाली दिलेल्या सूचना पाहा.

SMS द्वारे लिंक करण्यासाठी

१) आपल्या फोनमधील मेसेजवर जा. त्यानंतर UIDAI<12 अंकी आधार क्रमांक><10 अंकी पॅन क्रमांक> लिहून हा मेसेज 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा. यानंतर आपले आधार आणि पॅन आपल्या खात्याला संलग्र होईल. पण यासाठी तुम्ही ज्या नंबरवरुन हा मेसेज पाठवत आहात तो फोन क्रमांक बॅंकेला संलग्न असावा लागेल. जर तुमचा फोन बॅंकेला संलग्र नसेल तर तुम्ही दुसरी पद्धत वापरून लिंक करू शकता.

इनकम टॅक्स वेबसाईटवरुन लिंक करा.

१) सगळ्यात अगोदर https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या लिंकवर जाऊन वेबसाईट ओपन करा.

२) त्यानंतर आपल्याला होमपेजच्या डाव्या बाजूला लिंक आधार हा आॅप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

३) त्यानंतर एक नविन पेज ओपन होईल आणि त्यामध्ये आपल्याला नाव, आधार नंबर आणि पॅन नंबर टाकावा लागेल.

४) त्यानंतर कॅप्चा कोड टाकून ओटीपी साठी बटन दाबा.

५) नंतर ओटीपी टाकून लिंक आधारवर क्लिक करा. अशाप्रकारे आपण आपले आधार खात्याला लिंक करू शकता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com