SBI देणार आता FD वर जादा परतावा! बॅंकेने वाढवला व्याजदर | Arthavishwa | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SBI Bank
SBI देणार आता FD वर जादा परतावा! बॅंकेने वाढवला व्याजदर

SBI देणार आता FD वर जादा परतावा! बॅंकेने वाढवला व्याजदर

देशातील सर्वांत मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक - स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (State Bank of India - SBI) ठेव योजनेच्या दरात बदल केले आहेत. बॅंकेने एफडीचे (Fixed Deposit) दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर 15 डिसेंबर 2021 पासून लागू झाले आहेत. बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, 2 कोटी रुपयांवरील एफडीवर 10 बेसिस पॉइंट्‌सने व्याज वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच वेळी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. (State Bank of India will now give extra refund on fixed deposit)

ज्येष्ठ नागरिकांना मिळतील अतिरिक्त लाभ

स्टेट बॅंक ऑफ इंडिया सध्या 7 दिवस ते 10 वर्षांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर 2.9 टक्के ते 5.4 क्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) अतिरिक्त 50 बेसिस पॉइंट्‌स मिळत आहेत. हे दर 8 जानेवारी 2021 पासून लागू होणार आहेत.

जाणून घ्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एफडीवर मिळणारे नवीन व्याजदर

  • 7 ते 45 दिवसांच्या FD वर : 2.9 टक्के

  • 46 दिवस ते 179 दिवसांच्या FD वर : 3.9 टक्के

  • 180 दिवस ते 210 दिवसांच्या FD वर : 4.4 टक्के

  • 211 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी FD वर : 4.4 टक्के

  • 1 वर्ष किंवा त्याहून अधिक परंतु 2 वर्षांपेक्षा कमी FD वर : 5 टक्के

  • 2 वर्षे किंवा अधिक परंतु 3 वर्षांपेक्षा कमी FD वर : 5.1 टक्के

  • 3 वर्षे किंवा त्याहून अधिक परंतु 5 वर्षांपेक्षा कमी FD वर : 5.3 टक्के

  • 5 वर्षे ते 10 वर्षे FD वर : 5.4 टक्के

टॅग्स :viralupdateArthavishwaSBI