आता मोबाईलवर खेळता खेळता शिका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

मुलांसाठी शिक्षण मजेशीर बनविण्यासाठी नवीन गेमिफिकेशन ऍप "स्टेपऍप' भारतात दाखल करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांच्याहस्ते अॅपचे अनावरण करण्यात आले आहे.

मुंबई  : मुलांसाठी शिक्षण मजेशीर बनविण्यासाठी नवीन गेमिफिकेशन ऍप "स्टेपऍप' भारतात दाखल करण्यात आले आहे. मुंबईत नुकतेच प्रवीण त्यागी (व्यवस्थापकीय संचालक, पेस आयआयटी ऍण्ड मेडिकल) आणि अमिताभ बच्चन यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या ऍपचे सादरीकरण करण्यात आले.

यावेळी "अपना कल खुद बनाओ' असे आवाहन अमिताभ यांनी केले. तंत्रज्ञानाच्या मदतीने देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मजेशीर पद्धतीने उपलब्ध करून देणे, हे स्टेपऍपचे उद्दिष्ट असल्याचे कंपनीने या वेळी सांगितले. हे ऍप सर्व स्मार्टफोनवर चालणार आहे. 
 

web title : stepapp laanched in india

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stepapp laanched in india