esakal | शेअर बाजारात तेजी; सलग तिसऱ्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

Share-Market

शेअर बाजारात तेजी; सलग तिसऱ्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात दिवसभर चढ-उतार पहायला मिळाला आणि अखेर बाजार रेकॉर्ड ब्रेक पातळीवर बंद झाला. सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची ही शानदार कामगिरी पहायला मिळाली.

हेही वाचा: राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांमध्ये एक तृतीयांश घट; 16 टक्के गंभीर रुग्ण

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या सेन्सेक्समध्ये १६६.९६ अकांनी वाढ होऊन तो ५८,२९६.९१ वर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी १७,३७७.८० च्या पातळीवर बंद झाला. ही सेन्सेक्स आणि निफ्टीची आजवरची बंद होण्याची उच्च पातळी आहे. कामकाजादरम्यान सेन्सेक्स ५८,५१५.८५ आणि निफ्टी १७,४२९.५५ च्या पातळीवर पोहोचला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स २,००५.२३ अंकांनी वढारला होता.

दिग्गज शेअर्सची होती ही स्थिती

शेअर मार्केटमधील दिग्गज शेअर्सची आज दिवसभर चांगली कामगिरी राहिली. यामध्ये विप्रो, एचसीएल टेक, इन्फोसिस, रिलायन्स आणि हिंडाल्कोचे शेअर हिरव्या निशाणवर बंद झाले. तर ओएनजीसी, आयओसी, इंडसइंड बँक, ब्रिटानिया आणि कोटक बँकेचे शेअर लाल निशाण वर बंद झाले.

loading image
go to top