शेअर बाजारातील तेजीला विराम

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मुंबई - शेअर बाजारात सलग सात सत्रांत सुरू असलेले तेजीचे वारे अखेर गुरुवारी थांबले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५२ अंशांची घसरण होऊन ३६ हजार ४३१ अंशांवर बंद झाला. निफ्टी १५ अंशांची घट होऊन १० हजार ९५१ अंशांवर बंद झाला. 

‘फेडरल रिझर्व्ह’ने या वर्षी सलग चौथ्यांदा व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे जगभरातील शेअर बाजार आज कोसळले. याचा फटका देशांतर्गत शेअर बाजारालाही बसला. येस बॅंक, हिरो मोटोकॉर्प, एम अँड एम, एशियन पेंट्‌स, सन फार्मा, टाटा मोटर्स, एल अँड टी आणि एचडीएफसी बॅंक यांच्या समभागात ३.९३ टक्‍क्‍यांपर्यंत आज वाढ झाली. भारती एअरटेल, एसबीआय, विप्रो, वेदांता, मारुती सुझुकी, आयआयसीआय बॅंक, ॲक्‍सिस बॅंक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या समभागात २.१८ टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stock market breaks