Stock Market : सेन्सेक्स 1400 अंकानी, तर निफ्टी 15800 वर कोसळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

stock market closed with big fall sensex slips more than 1400 points nifty on 15800

Stock Market : सेन्सेक्स 1400 अंकानी, तर निफ्टी 15800 वर कोसळला

मुंबई : आठवड्याच्या चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजार उघडताच घसरला आणि दिवसभर बाजारात जोरदार घसरण पाहायला मिळाली. जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतशी बाजारातील घसरण वाढत गेली आणि अखेर बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स निर्देशांक 1416 अंकांनी किंवा 2.61 टक्क्यांनी घसरून 52,792 च्या पातळीवर बंद झाला. यासह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही 431 अंकांनी किंवा 2.65 टक्क्यांनी घसरून 15,809 वर बंद झाला.

2413 शेअर्समध्ये घसरण

दिवसाच्या अखेरीस तब्बत 838 शेअर्समध्ये तेजी आली तर 2413 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली तर 122 शेअर्समध्ये कोणताही बदल पाहायला मिळाल नाही. निफ्टी इंडेक्समध्ये सर्वाधिक नुकसान विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टीसीएस, टेक महिंद्रा आणि इन्फोसिस चे झाले, तर सर्वाधिक लाभ मिळवलेले शेअर्समध्ये आयटीसी, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन यांचा समावेश होता. मेटलसह सर्व सेक्टोरियल इंडेक्स लाल रंगात बंद झाले, तर आयटी निर्देशांक चार ते पाच टक्क्यांनी घसरले. दरम्यान, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स प्रत्येकी दोन-दोन टक्क्यांहून अधिक अंकानी घसरले.

गुरुवारी, BSE सेन्सेक्स 900 अंकांनी किंवा 1.66 टक्क्यांनी घसरून 53,308 वर उघडला, तर NSE निफ्टी 269 अंकांनी किंवा 1.66 टक्क्यांनी घसरून 15,971 च्या पातळीवर उघडला. बाजार उघडल्यानंतर जवळपास 370 शेअर्समध्ये वाढ झाली, 1629 शेअर्स खाली आले, तर 73 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. व्यवसाय सुरू होताच, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले, जो दिवसाच्या अखेरपर्यंत त्यात आणखी वाढ झाली.