नाराज सिध्दूंचा 'आप'मध्ये जाण्याचा विचार? धाकटा भाऊ म्हणत भगवंत मान यांची थोपटली पाठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navjot Singh Sidhu

गेल्या काही दिवसांपासून सिध्दू काँग्रेसवर नाराज आहेत.

Navjot Singh Sidhu : नाराज सिध्दूंचा 'आप'मध्ये जाण्याचा विचार?

चंदीगड : पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना 'रबरी बाहुली' म्हटल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी पंजाब काँग्रेसचे (Punjab Congress) माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिध्दू यांनी आपल्या वक्तव्यानंतर 'युटर्न' घेतलाय. नवज्योतसिंह सिध्दू यांनी भगवंत मान (Bhagwant Mann) यांना धाकटा भाऊ आणि प्रामाणिक माणूस म्हणून संबोधलंय. यासोबतच काँग्रेसनं स्वत:ची नव्यानं बांधणी करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हंटलंय. सिध्दूंच्या या स्तुतीमुळं सिध्दू आपमध्ये प्रवेश करणार का? याची जोरदार चर्चा सुरुय.

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंह सिध्दू (Navjot Singh Sidhu) यांनी राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर काल जोरदार हल्लाबोल केला होता. एवढंच नाही, तर सिध्दूंनी भगवंत मान यांची तुलना रबराच्या बाहुलीसोबत (Rubber Doll) केली होती. दिल्लीतून आपच्या (AAP) नेतृत्वाखाली पंजाबमध्ये सरकार चालत असल्याचा विरोधकांचा आरोपही यावेळी सिध्दूंनी योग्य ठरवला. मान सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेत कमालीची घट झाल्याचा दावा सिध्दूंनी काल केला होता. मात्र, आता सिध्दूंनी आपल्या वक्तव्यानंतर युटर्न घेतलाय. सिध्दूंनी भगवंत मान यांना आपला धाकटा भाऊ आणि प्रामाणिक माणूस असल्याचं म्हंटलंय. त्यांच्या या स्तुतीनंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडालीय. गेल्या काही दिवसांपासून सिध्दू काँग्रेसवर नाराज आहेत. त्यातच आता सिध्दूंच भगवंत मान यांच्याविषयी असलेलं मत समोर आल्याने सिध्दू काँग्रेसचा 'हात' सोडणार का? याची चर्चा सुरु झालीय.

हेही वाचा: हार्दिक पटेल काँग्रेसचा 'हात' सोडणार? हायकमांडला देणार मोठा धक्का!

दरम्यान, सिध्दू यांच्यासह माजी आमदार नवतेज सिंह चीमा आणि अश्विनी सेखरी यांनी चंदीगडमध्ये पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसह विविध मुद्दे उपस्थित केले. सिध्दू म्हणाले, मान सरकारच्या काळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था झपाट्याने ढासळत आहे. गेल्या महिनाभरात राज्यात 40 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केलाय. यावेळी सिध्दूंनी मान यांना पंजाबची काळजी आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यावर उत्तर देताना सिद्धू यांनी मान म्हणजे 'रब्बर का गुड्डा' झाले आहेत, अशा शब्दात टीका केली होती. या वक्तव्यानंतर त्यांनी 'युटर्न' घेतलाय.

Web Title: Punjab Navjot Singh Sidhu Said Bhagwant Mann Is My Younger Brother And Very Honest Man Chandigarh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..