esakal | Share Market: सत्राच्या सुरुवातीलाच बाजारात तेजी; सेन्सेक्स 44,225.53 अंशांवर
sakal

बोलून बातमी शोधा

stock market first day

आठवड्याच्या पहिल्या सत्रात भारतीय भांडवली बाजारात मोठी तेजी दिसत आहे

Share Market: सत्राच्या सुरुवातीलाच बाजारात तेजी; सेन्सेक्स 44,225.53 अंशांवर

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई: आठवड्याच्या पहिल्या सत्रात भारतीय भांडवली बाजारात मोठी तेजी दिसत आहे. सत्राच्या सुरुवातीलाच सेन्सेक्सचा निर्देशांक 343.28 अंशांची वाढ होऊन 44,225.53 पर्यंत गेला आहे. तर निफ्टी 99.00 अंशांनी वाढून 12,958.05 वर गेला आहे. कोरोनाच्या लशीबद्दल येत असलेल्या सकारात्मक घडामोंडीमुळे बाजारात तेजी दिसत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

आजच्या भांडवली बाजाराच्या (stock market) व्यवहारात 1013 शेअर्समध्ये तेजी आणि 325 शेअर्समध्ये घसरण झाल्याचे दिसत आहे. तर 69 शेअर्स स्थिर आहेत. आज मोठ्या शेअर्ससोबत मिडकॅप शेअर्समध्ये  तेजी दिसून येत आहे. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.83 टक्क्यांनी वाढून व्यवहार करत आहे.

मोठ्या शेअर्ससोबतच स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदी-विक्री जोरात दिसत आहे. BSE चा स्मॉलकॅप निर्देशांक 0.86 टक्के वाढून बाजारात तेजीत दिसत आहे.  तेल-वायूच्या निर्देशांकातही आज खरेदी दिसून येत आहे. बीएसईचा तेल आणि वायू निर्देशांक 1.25 टक्के दराने व्यवहार करत आहे.

आरबीआयच्या नावावर अनोखा विक्रम ; यूएस फेडला देखील टाकले मागे

शनिवारी चांगल्या स्थितीत बाजार बंद झाला होता-
यापूर्वी शनिवारी बाजार तेजीत बंद झाला होता. सेन्सेक्स (Sensex) 282.29 अंशांनी वधारून 43,882.25 अंशांवर बंद झाला आणि निफ्टी (Nifty) 87.30 अंशांनी वधारून 12859 वर बंद झाला होता.

(edited by- pramod sarawale)

loading image