आरबीआयच्या नावावर अनोखा विक्रम ; यूएस फेडला देखील टाकले मागे 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

सोशल माध्यमावरील ट्विटरवर भारतीय रिझर्व्ह बँकच्या (आरबीआय) फॉलोअर्सची संख्या 10 लाखांच्या पुढे गेली आहे.

सोशल माध्यमावरील ट्विटरवर भारतीय रिझर्व्ह बँकच्या (आरबीआय) फॉलोअर्सची संख्या 10 लाखांच्या पुढे गेली आहे. सोशल मीडियावरील ट्विटरवर 10 लाखांच्या फॉलोअर्सचा टप्पा गाठणारी आरबीआय पहिली मध्यवर्ती बँक बनली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फॉलोअर्सच्या बाबतीत यूएस फेडरल रिझर्व्ह आणि युरोपियन मध्यवर्ती बँकेला देखील मागे टाकले.  

Petrol- Diesel prices: पेट्रोल- डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; बघा आजच्या किंमती

आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रविवारी ट्विटरवरील आरबीआयच्या अधिकृत अकाउंटला फॉलो करणाऱ्यांची संख्या 10 लाखांवर गेली असल्याचे ट्विट केले. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केलेल्या या ट्विट मध्ये, एक नवीन मैलाचा दगड असे लिहीत आरबीआयच्या ट्विटर अकाउंटचे फॉलोअर्स 10 लाखांवर पोहचले असल्याचे म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षात 2.5 लाख नव्या युझर्सने आरबीआयला फॉलो करण्यास सुरवात केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकच्या (आरबीआय) शिवाय आरबीआयचे अजून एक ट्विटर हँडल आहे. ज्याचे नाव 'आरबीआय सेज', असे आहे. आणि त्याशिवाय बँकेचे त्याच नावाने फेसबुक पेज आहे.    

दरम्यान, जगातील सर्वात शक्तिशाली केंद्रीय बँक म्हणून ओळखली जाणारी यूएस फेडरल रिझर्व बँक 2009 पासून ट्विटरवर आहे. आणि या बँकेचे फॉलोअर्स 6.67 लाख आहेत. तर त्यानंतर युरोपियन सेंट्रल बँकेच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 5.91 लाख आहे. आणि युरोपियन सेंट्रल बँक देखील  2009 पासून ट्विटरवर आहे.         


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unique record in the name of RBI and also left behind The US Fed