Stock Market Opening : आठवड्याचा शेवटी सेन्सेक्स-निफ्टी गडगडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

stock market live on 23 september 2022 sensex nifty down

Stock Market Opening : आठवड्याचा शेवटी सेन्सेक्स-निफ्टी गडगडला

भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी सकाळी सलग तिसऱ्या सत्रात घसरण पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील घसरण आणि रुपयाची विक्रमी कमजोरी यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवरही नकारात्मक परिणाम दिसून येत आहे.(stock market live on 23 september 2022 sensex nifty down)

आज सकाळी सेन्सेक्स उघडला आणि 115 अंकांच्या घसरणीसह 59,005 वर व्यापार सुरू केला, तर निफ्टी 36 अंकांच्या घसरणीसह 17,594 वर उघडला आणि व्यवहाराला सुरुवात झाली. गुंतवणूकदारांनी आज सुरुवातीपासूनच विक्री सुरू ठेवली आणि सततच्या नफावसुलीमुळे सकाळी 9.25 वाजता सेन्सेक्स 250 अंकांनी घसरून 58,867 वर, तर निफ्टी 50 अंकांनी घसरून 17,600 वर पोहोचला.

आज सकाळपासूनच गुंतवणूकदार एचडीएफसी, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक आणि टाटा मोटर्स यांसारख्या कंपन्यांवर सट्टा लावत आहेत आणि सततच्या खरेदीमुळे या कंपन्यांचे शेअर्स टॉप गेनर्सच्या यादीत आले आहेत. दुसरीकडे, टाटा स्टील, सिप्ला, हिरो मोटोकॉर्प, अपोलो हॉस्पिटल्स आणि जेएसडब्ल्यू स्टील या कंपन्यांच्या विक्रीमुळे घसरण झाली आणि हे शेअर्स टॉप लूजर्सच्या यादीत सामील झाले.

आजचा व्यवसाय क्षेत्रनिहाय बघितला तर सर्वच क्षेत्रात चढ-उतार होत आहेत. तर, निफ्टी मीडिया, निफ्टी फार्मा, निफ्टी मेटल यांसारख्या क्षेत्रांमध्ये किरकोळ वाढ झाली आहे, तर निफ्टी बँक, रिअॅल्टी आणि ऊर्जा क्षेत्रांमध्ये आज 1 टक्क्यांपर्यंत घसरण होत आहे. निफ्टी स्मॉलकॅप 100 आणि मिडकॅप 100 देखील आज सुरुवातीच्या व्यवहारात 0.2 टक्क्यांनी घसरत आहेत.

Web Title: Stock Market Live On 23 September 2022 Sensex Nifty Down

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..