Share Market Opening : दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक, सेन्सेक्स 68 अंकांच्या वाढीसह 61405 वर उघडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Opening : दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक, सेन्सेक्स 68 अंकांच्या वाढीसह 61405 वर उघडला

Share Market Opening : सेन्सेक्स 68 अंकांच्या वाढीसह 61405 वर, निफ्टी 18280 वर उघडला. देशांतर्गत शेअर बाजारात आज तेजी सुरू झाली असून सेन्सेक्सने 61,000 चा टप्पा ओलांडला आहे. बाजार उघडताना बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 67.99 अंकांच्या म्हणजेच 0.11 टक्क्यांच्या वाढीसह 61,405.80 वर उघडला.

BSE India

BSE India

बँक निफ्टी 126 अंकांच्या वाढीसह 43346 वर उघडला. पॉवरग्रिड, नेस्ले इंडिया, इंडसइंड बँक, बजाज फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि आयसीआयसीआय बँक सुरुवातीच्या व्यवहारात वधारले. इन्फोसिस, सन फार्मा, टाटा मोटर्स आणि एचडीएफसी बँकेचे समभाग घसरले. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 6 पैशांच्या मजबूतीसह 82.81 च्या पातळीवर उघडला.

BSE India

BSE India

या समभागांनी निफ्टीवर सर्वाधिक वाढ दर्शविली :

एनएसई निफ्टीमध्ये पॉवरग्रिडचे शेअर्स सर्वाधिक 1.01 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते. याशिवाय हिंदाल्को, डॉ रेड्डीज, इंडसइंड बँक आणि अपोलो हॉस्पिटल्सचे शेअर्स वधारले.

या शेअर्समध्ये घसरण :

निफ्टीमध्ये इन्फोसिस, सन फार्मा, टीसीएस, टेक महिंद्रा आणि विप्रो लाल रंगात व्यवहार करत होते.

आशियाई शेअर बाजारात संमिश्र कल :

2022 च्या शेवटच्या पूर्ण ट्रेडिंग आठवड्यात आशियाई शेअर बाजारांमध्ये संमिश्र कल दिसून आला. पुढील वर्षी व्याजदरात वाढ होण्याची शक्यता असल्याने निर्माण झालेल्या चिंतेने बाजारातील गुंतवणूक कमी झाली आहे.