Share Market Opening : जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; आज 'या' शेअर्समध्ये तेजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Opening : जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; आज 'या' शेअर्समध्ये तेजी

Share Market Opening : जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात घसरणीसह व्यवहार सुरू झाले आहेत.

यूएस शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाले आणि आशियाई बाजार खाली व्यवहार करत होते. यामुळे BSE सेन्सेक्स 282 अंकांनी घसरून 60,628 वर आणि NSE निफ्टी 77 अंकांनी घसरून 18,045 अंकांवर उघडला.

बाजारातील या घसरणीमध्ये फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातील समभाग वगळता सर्वच क्षेत्रातील समभागांमध्ये घसरण दिसून येत आहे. बँक निफ्टी, निफ्टी आयटी, निफ्टी ऑटो, मेटल्स, एनर्जी, एफएमसीजी, इन्फ्रा क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्येही घसरण आहे. निफ्टीच्या 50 समभागांपैकी फक्त 6 समभाग वेगाने व्यवहार करत आहेत तर 44 समभाग खाली आहेत. सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी फक्त 2 समभाग वर आहेत तर 28 समभाग खाली आहेत.

BSE India

BSE India

तेजीत असलेले शेअर्स :

शेअर्सवर नजर टाकल्यास डॉ. रेड्डी 1.63 टक्के, डिव्हिस लॅब 1.03 टक्के, सिप्ला 0.76 टक्के, ओएनजीसी 0.76 टक्के, सन फार्मा 0.67 टक्के, भारती एअरटेल 0.37 टक्के, यूपीएल 0.30 टक्के, अपोलो हॉस्पिटल 0.18 टक्के या शेअर्समध्ये तेजी आहे.

घसरण झालेले शेअर्स :

टाटा स्टील 1.18 टक्के, बजाज फायनान्स 0.97 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.90 टक्के, लार्सन 0.84 टक्के, एचयूएल 0.80 टक्के, कोटक महिंद्रा 0.75 टक्के, अ‍ॅक्सिस बँक 0.75 टक्के, पॉवर 0.75 टक्के. 0.72 टक्के, मारुती सुझुकी 0.69 टक्के, आयटीसी 0.67 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

जागतिक बाजारात घसरण :

बुधवारी अमेरिकन शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. डाऊ जोन्स 1.10 टक्क्यांनी आणि नॅस्डॅक 1.35 टक्क्यांनी अंकांनी घसरला. आशियातील हँगसेंग, कोस्पी, तैवान, निक्केई मार्केटमध्ये घसरण आहे.

आज बाजारात भारती एअरटेल (BHARTIARTL), अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP), बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV), ऍक्सिस बँक (AXISBANK), हिन्दाल्को (HINDALCO), एल अँड टी सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS) या शेअर्समध्ये तेजी दिसू शकते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.