Share Market : शेअर बाजारात तेजी, 'या' मोठ्या शेअर्सकडे गुंतवणूकदारांची नजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

stock market

आजच्या व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स 200 हून अधिक अंकांची उसळी घेत आहे.

Share Market : शेअर बाजारात तेजी, 'या' मोठ्या शेअर्सकडे गुंतवणूकदारांची नजर

आज भारतीय शेअर बाजारात आठवड्याचे शेवटचे दिवस शिल्लक राहिल्याने देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह व्यवहार होताना दिसत आहे. जागतिक बाजारात तेजी दिसत असून आशियाई बाजारातही संमिश्र व्यवहार असल्याने बाजाराला तेजी मिळाली आहे. कालच्या चांगल्या संकेतांनंतर आज यूएस फ्युचर्समध्ये फ्लॅट ट्रेडिंग दिसून येत आहे.

आजच्या व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स 200 हून अधिक अंकांची उसळी घेत आहे. आज बीएसई 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 220.75 अंकांच्या किंवा 0.38 टक्क्यांच्या उसळीसह 58,571.28 वर उघडला. NSE चा निफ्टी 74.95 अंक किंवा 0.43 टक्क्यांच्या वाढीसह 17,463.10 वर उघडला आहे.

हेही वाचा: Fortune Global 500 List : अंबांनींच्या कंपनीला मागे टाकतं LIC ची आघाडी

दरम्यान, NSE निफ्टी सध्या 17, 500 च्या जवळ दिसत आहे. आजच्या व्यवहारात तो 17, 500 च्या पातळी गाठेल अशी अपेक्षा आहे. आज निफ्टीच्या 50 पैकी 38 समभागांमध्ये उसळी पाहायला मिळत असून उर्वरित 12 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत. बँक निफ्टीसंदर्भात तो सुमारे 150 अंकांनी वर चढला असून 38,138 च्या पातळीवर राहिला आहे.

आज निफ्टी एफएमसीजी, पीएसयू बँक, रियल्टी आणि तेल आणि वायू व्यतिरिक्त, इतर सर्व क्षेत्रे गतीने व्यवहार करत आहेत. 1.69 टक्‍क्‍यांची सर्वात मोठी उडी आयटी समभागात दिसली असून हेल्थकेअर इंडेक्स 0.68 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. ऑटो शेअर्समध्येही सुमारे 0.25 टक्क्यांनी वाढ होत आहे. आज सेन्सेक्समधील 30 पैकी 26 समभागांनी उसळी घेतली आहे. यामध्ये इन्फोसिस, टेक महिंद्रा, टीसीएस, विप्रो, बजाज फायनान्स, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, एलएएनटी आणि अॅक्सिस बँक यांचे शेअर्स मोठ्या वाढीसह व्यवहार करत आहेत.

हेही वाचा: खरेदी करण्याची सुवर्ण संधी! श्रावणात सोन्याची घसरण सुरुच, जाणून घ्या नवे दर

आजचे घसरलेले स्टॉक

सेन्सेक्सच्या आजच्या घसरत्या समभागांवर नजर टाकली तर टायटन, पॉवरग्रिड, एचयूएल, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती सुझुकी, एसबीआय आणि एनटीपीसी या कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे. प्री-ओपनिंगमध्येही बाजारात चांगली उसळी घेऊन व्यवसाय होताना दिसत आहे आणि आज एसजीएक्स निफ्टी 17485 च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Web Title: Stock Market Opening Of 4 August Higher Notes Sensex Surge 220 Points

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..