Share Market Closing : सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बाजार बंद; टाटा कंपनीच्या 'या' शेअर्समध्ये घसरण

जागतिक बाजारात तेजी असतानाही आज भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली आहे.
Share Market
Share Marketsakal
Updated on

Share Market Closing : जागतिक बाजारात तेजी असतानाही आज भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली आहे. कोरोनाच्या भीतीने सरकार उच्चस्तरीय बैठक घेत आहे, त्यामुळे निर्बंध आणि अर्थव्यवस्थेचे नुकसान यामुळे शेअर बाजारात भीतीचे वातावरण आहे.

आजच्या व्यवहारा शेवटी BSE सेन्सेक्स 218 अंकांनी घसरून 60,848 वर आणि निफ्टी 71 अंकांनी घसरून 18,122 अंकांवर बंद झाला.

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

सर्वच क्षेत्रातील समभाग घसरले :

आज शेअर बाजारातील घसरणीपासून कोणतेही क्षेत्र वाचले नाही. बँकिंग, आयटी, ऑटो, एफएमसीजी, एनर्जी, फार्मा, मेटल्स या सर्व क्षेत्रांचे शेअर्स घसरले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही घसरण दिसून आली.

BSE India
BSE IndiaSakal

बाजारात मोठी घसरण होऊनही अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स 0.77 टक्क्यांनी, इन्फोसिसचे 0.67 टक्क्यांनी, कोटक महिंद्रा बँकेचे 0.61 टक्क्यांनी, एशियन पँट्सचे 0.60 टक्क्यांनी, सन फार्माचे शेअर्स 0.44 टक्क्यांनी आणि भारती एअरटेलचे शेअर्स 0.44 टक्क्यांनी वधारले.

बजाज फिनसर्व्हचे समभाग 2.63 टक्क्यांनी, महिंद्रा अँड महिंद्रा 2.37 टक्क्यांनी, टाटा मोटर्सचे 2.08 टक्क्यांनी, लार्सनचे 1.70 टक्क्यांनी, टाटा स्टीलचे 1.65 टक्क्यांनी घसरले. अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स आणि इन्फोसिस सारख्या समभागांनी तेजी घेतली.

गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

शेअर बाजारातील घसरणीमुळे आजही गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांचे 2.30 लाख कोटी रुपये बुडाले. बीएसई मधील सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप 280.53 लाख कोटी रुपये आहे, बुधवारी मार्केट कॅप 282.84 लाख कोटी रुपये होते.

Share Market
Sula Vineyards Listing: सुला वाईनने केली गुंतवणूकदारांची निराशा; जाणून घ्या शेअर्सची किंमत

आजच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या 30 पैकी 24 समभागांमध्ये घसरण दिसून आली, तर निफ्टीच्या 50 पैकी 40 समभागांमध्ये घसरण झाली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 9 समभागांमध्ये घसरण झाली.

जेके पेंट्स ACRO PAINTS मध्ये 60% हिस्सा खरेदी करणार :

JK Paints ACRO PAINTS मधील 60 टक्के हिस्सा 153 कोटी रुपयांना विकत घेणार आहे. जेके पेंट्स पहिल्या टप्प्यात 60 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. पुढील 12 महिन्यांत उर्वरित 40 टक्के भागभांडवल खरेदी करेल.

रिलायन्स रिटेलने मेट्रो कॅश अँड कॅरी ताब्यात घेतली :

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ने मेट्रो कॅश अँड कॅरी इंडिया लिमिटेड (मेट्रो इंडिया) विकत घेतले आहे. हा करार 2,850 कोटी रुपयांना पूर्ण झाला आहे. RRVL आणि METRO India यांनी 100 टक्के इक्विटी स्टेक विकण्याचा करार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com