esakal | शेअर बाजारात पुन्हा घसरण 
sakal

बोलून बातमी शोधा

शेअर बाजारात पुन्हा घसरण 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 536 अंशांनी घसरून 31 हजार 327 अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 159 अंशांची घसरण झाली. तो 9 हजार 154 पातळीवर स्थिरावला.

शेअर बाजारात पुन्हा घसरण 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई - जागतिक अर्थव्यवस्थेवर कोरोनाचे ढग गडद होत चालले आहेत. जागतिक पातळीवरून मिळणाऱ्या नकारत्मक संकेतामुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातदेखील घसरण झाली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 536 अंशांनी घसरून 31 हजार 327 अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 159 अंशांची घसरण झाली. तो 9 हजार 154 पातळीवर स्थिरावला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांसह संपूर्ण जगभरात होणारी जीवितहानी आटोक्‍यात येत नसल्याने आणि दुसरीकडे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या नकारात्मक परिणामाचे अंदाज आणि आकडेवारी सतत नव्याने समोर येत असल्याने जगभरातील गुंतवणूकदार चिंतेत आहेत. त्यातच देशांतर्गत पातळीवर फ्रॅंकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडाने डेट फंडातील सहा योजना एकाचवेळी बंद केल्याने त्याचा परिणाम भारतीय गुंतवणूकदारांवर झाल्याने त्यांनी शेअर विक्रीचा मारा केला. 

क्षेत्रीय पातळीवर फार्मा निर्देशांक वगळता सर्वच निर्देशांक नकारात्मक व्यवहार करत बंद झाले. रिअल्टी, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि बॅंकिंग निर्देशांकात मोठी घसरण नोंदविण्यात आली. 

सेन्सेक्‍सच्या मंचावर बजाज फायनान्स, इंडसइंड बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली होती. तर रिलायन्स, सनफार्मा, हिरो मोटोकॉर्प एल अँड टी आणि पॉवरग्रीडचे शेअर सर्वाधिक वधारले होते. 

रुपया घसरला 
आंतरराष्ट्रीय चलन बाजारात रुपयाचे डॉलरच्या तुलनेत 36 पैशांनी अवमूल्यन झाले. रुपया डॉलरच्या तुलनेत 76.45 रुपये प्रति डॉलरवर स्थिरावला. 

loading image