Success Story : तरूण-तरूणींनो, आत्मनिर्भर बना! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 December 2020

पारंपरिक शिक्षणानंतर तरूण-तरूणींनी केवळ नोकरीच्या मागे न धावता स्वत-च्या पायावर उभे राहावे, उद्योजकतेची कास धरावी आणि आत्मनिर्भर बनावे, ही बामगुडे यांची इच्छा.

पानशेत धरणग्रस्त कुटुंबातील एक मुलगा गावाकडेच शिकतो, नंतर शहरात येतो. नोकरीच्या शोधात भटकतो. या काळात छोट्या-मोठ्या कामातून बरेच काही शिकतो. पुढे कष्ट, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर वित्तीय क्षेत्रात उद्योजकतेचा आदर्श निर्माण करतो. सचिन बामगुडे हे या तरूणाचे नाव. एसपी ग्रुप आॅफ कंपनीजचा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक. पारंपरिक शिक्षणानंतर तरूण-तरूणींनी केवळ नोकरीच्या मागे न धावता स्वत-च्या पायावर उभे राहावे, उद्योजकतेची कास धरावी आणि आत्मनिर्भर बनावे, ही बामगुडे यांची इच्छा. ‘सकाळ’ विद्या आणि एसपी फायनान्स ॲकॅडमी आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (ता. १३ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजता पुण्यातील गणेश कला-क्रीडा मंच येथे एका खास सेमिनारचे आयोजन केले जाणार आहे. यानिमित्ताने त्यांची ही यशकथा. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रश्न - वित्तीय क्षेत्रात एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारुपास येण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
सचिन - पुण्यापासून जवळ असलेल्या टेकपवळे हे आमचे गाव. दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत माझे चौथीपर्यंत शिक्षण झाले. पुढे पुण्याच्या जनता वसाहत झोपडपट्टीत काकांकडे राहून शिक्षण घेतले. आई-वडिल दुसऱ्यांच्या शेतात जाऊन काम करायचे. १९९७ मध्ये खऱ्या अर्थाने पुणे शहरात आलो. चार वर्षे हॉटेलामध्ये पडेल ते काम केले. पुढे शिकण्याची जिद्द कायम ठेवत एका प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानात, तर नंतर एका दुचाकीच्या शोरूममध्ये नोकरी केली. या अनुभवाच्या जोरावर एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकेतही नोकरीची संधी मिळाली. पण स्वबळावर काहीतरी करण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच ‘एसपी एंटरप्रायझेस’ची स्थापना केली आणि प्रामुख्याने गृहकर्ज वितरणाच्या क्षेत्रात कामाला सुरवात केली. त्यासाठी एलआयसी हाउसिंग फायनान्सशी टाय-अप केले. सुरवातीच्या टप्प्यात फारसा व्यवसाय न झाल्याने निराशा पदरी पडली, पण निश्चयाने पुन्हा कामाला लागलो. अखेर यश प्राप्त होत गेले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रश्न - यशाच्या या टप्प्यानंतर व्यवसायवृद्धी कशी केली? 
सचिन - बारा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या व्यवसायाच्या प्रारंभीच्या टप्प्यात आलेल्या अनुभवातून बरेच शिकायला मिळाले. गृहकर्जाबरोबरच व्यवसायकर्जावर लक्ष द्यायला सुरवात केली आणि हळूहळू जम बसू लागला. प्रारंभी दोन कोटी रुपयांचे कर्जवितरण झाले. पुढे ५५ कोटी, ११० कोटी, ११०० कोटी, १५०० कोटी आणि आता सुमारे ३००० हजार कोटी रुपयांच्या वर कर्जवितरणाची उलाढाल पोचली आहे. देशातील कर्ज वितरणाच्या क्षेत्रातील एक मोठी कंपनी म्हणून नावलौकिक मिळाला, अनेक पुरस्कारही मिळाले. आज देशातील नामांकित बँका, वित्तीय कंपन्यांशी आम्ही जोडले गेलो असून, गृहकर्ज, व्यवसायकर्ज, मालमत्ता तारण कर्ज, शैक्षणिक कर्ज आदी विविध प्रकारच्या लोकांच्या गरजा आम्ही पूर्ण करीत आहोत. 

सेमिनारसाठी नावनोंदणी कशी कराल?
http://www.sakalseminar.com वर जाऊन किंवा सोबतचा QR code स्कॅन करून छोटासा फॉर्म भरावा. 

प्रश्न - विस्ताराच्या आघाडीवर नव्या कल्पना काय आहेत? 
सचिन - पुणे, मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये आमची कार्यालये आहेत. वित्तीय क्षेत्रातील अनुभवी लोकांची टीम आमच्याकडे आहे. मध्यंतरी ‘अपना रुपी’ नावाचे मोबाईल ॲप आम्ही सुरू केले. फक्त उद्योग-व्यवसाय न करता तरूण-तरूणी, गृहिणी यांच्यासाठी रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठी आम्ही ‘एसपी फायनान्स ॲकॅडमी आॅफ इंडिया’ची स्थापना केली आणि त्या माध्यमातून वित्तीय उद्योजकेसाठी आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमाची सुरवात केली. डॉ. विवेक बिंद्रा यांच्या ‘बडा बिझनेस’सोबत आम्ही भागीदारी केली आहे. अतिशय किफायतशीर शुल्कात सहा महिन्यांच्या विस्तृत कोर्सची आखणी आम्ही केली आहे. हा कोर्स केल्यानंतर संबंधितांना कोणत्याही भांडवलाविना या व्यवसायात काम करून चांगले उत्पन्न मिळविता येऊ शकते. चिकाटीने शिकून मेहनत केल्यास महिन्याला लाखभर रुपये मिळविण्याची क्षमता या व्यवसायात आहे. आजच्या तरूण पिढीने केवळ नोकरीच्या मागे न धावता वित्तीय उद्योजकतेच्या क्षेत्रातील संधी लक्षात घेऊन आत्मनिर्भर बनावे, अशी माझी इच्छा आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success Story Sachin Bamgude article for youth Become self-reliant