कोरोना काळात आर्थिक नियोजनावर द्या भर...!

सुधाकर कुलकर्णी
Monday, 1 June 2020

अर्थव्यवस्थेवरील झालेला विपरीत परिणाम दूरगामी असणार आहे. मात्र कोरोनाच्या संकटातून  आर्थिकदृष्ट्या सावरण्यासाठी प्रत्येकाने  आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे, कसे ते आपण पाहू.   

कोरोनाच्या संकटाचा सर्वजण सामना करत असून गेले 2 महिने लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.  लॉकडाऊनचा एक दुष्परिणाम म्हणजे अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे. अर्थव्यवस्थेवरील झालेला विपरीत परिणाम दूरगामी असणार आहे. या परिणामाची व्याप्ती प्रत्येकावर कमी-अधिक प्रमाणात असणार आहे. मात्र कोरोनाच्या संकटातून आर्थिकदृष्ट्या सावरण्यासाठी प्रत्येकाने आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे, कसे ते आपण पाहू.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

1) दैनंदिन खर्चात शक्य होईल तेवढी कपात करून दरमहा कमीतकमी किती खर्च असेल याचा अंदाज घ्या. त्यानुसार किमान सहा महिने पुरेल इतकी रक्कम बँकेत बचत खात्यात ठेवा.

2) तरुणांनी वार्षिक उत्पन्नाच्या किमान 15 पट "लाईफ इन्श्युरन्स कव्हर' घ्यावे, असे कव्हर "टर्म इन्श्युरन्स' माध्यमातून घेतल्यास कमी प्रीमियममध्ये असे कव्हर मिळू शकेल, सध्याच्या परिस्थितीत असे कव्हर असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. यासोबत किमान रु.पाच लाखाचे "मेडिक्लेम कव्हर फ्लोटर' पद्धतीने घ्यावे.

गुंतवणूक कशी कराल आणि कुठे कराल...

3. सध्याच्या काळात खूप मोठी गुंतवणूक टाळा. रोखे, शेअरमधील एकरकमी सध्या टाळावी. मोठी किंवा महागडी खरेदी करू नये. कोरोनामुळे असणारा  संभाव्य धोका लक्षात घेऊन अधिकाधिक रोख रक्कम (लिक्विडीटी) असणे गरजेचे आहे.

4) नजीकच्या काळात लॉकडाऊन उठवला जाऊ शकतो. त्यानंतर शिल्लक असलेल्या चैनीच्या वस्तूंवर मोठा "डिस्काऊंट' दिला जाण्याची शक्यता आहे. केवळ "डिस्काऊंट' मिळतोय म्हणून अनावश्यक खरेदी करू नका.

5) कमीतकमी क्रेडीट कार्ड वापरा.

6)बँकेकडून सहा महिन्यांचा "ईएमआय हॉलिडे' देण्यात आला आहे, आपल्याला खरोखरीच कर्जाचा हप्ता भरणे शक्य नसेल तरच या सवलतीचा लाभ घ्या, कारण या मुदतीत कर्जावरील व्याज वाढत जाणार आहे हे लक्षात घ्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

7) बहुतेक बँकांनी कोविड-19 "पर्सनल लोन स्कीम' आणली असून यातून 5 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता व यासाठीचा व्याज दर अगदी माफक आहे. जर आधीचे कर्ज जास्त व्याजाचे असेल तर असे कर्ज घेऊन आधीचे कर्ज परत करणे फायदेशीर ठरू शकते. हे कर्ज व्यवसायास चालना देण्यास उपयुक्त ठरू शकते.
नजीकच्या काळात आपले उत्पन्न कसे व किती असेल हे विचारात घेऊन नवीन आर्थिक दायित्वाचा निर्णय घ्या .

8) वस्तूंचा जपून किंवा पुनर्वापर करून खर्च होताहोईल तितका कमी करा.

9) बँक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करून बँकेत जाण्यासाठीचा वेळ व खर्च वाचवा.

10) लाईफ इन्श्युरन्स, मेडिक्लेम, व्हेईकल इन्शुरन्सचा प्रीमियम वेळेवर भरून या "पॉलिसी फोर्स'मध्ये राहतील याची काळजी घ्यावी.

11) गरजांचे शॉर्ट टर्म, मिडीयम टर्म व लॉंग टर्म असे वर्गीकरण करून या आधी ठरविलेल्या आर्थिक उद्दिष्टांचा पुनर्विचार करून आवश्यक ते बदल करावे. त्यानुसार शिल्लक रकमेची गुंतवणूक जास्तीतजास्त "रिटर्न' मिळेल अशा पद्धतीने जोखीम समजून घेऊन मगच करा.

विकासदराला उतरती कळा; चौथ्या तिमाहीत जीडीपी ३.१ टक्क्यांवर 

12) कोणतेही आर्थिक निर्णय भीतीने किंवा भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका. 

13)इच्छा पत्र अद्याप केले नसेल तर जरूर करून ठेवा.
आपल्या गुंतवणुकीची माहिती व तपशील आपल्या जवळच्या व्यक्तीला देऊन ठेवा.

लेखक सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sudhakar kulkarni article financial planning during the Corona period

Tags
टॉपिकस
Topic Tags: