फ्लोटिंग रेट टर्म डिपॉझिट

बँकांच्या मुदत ठेवींवर प्रत्यक्ष रक्कम जमा करताना जो व्याजदर संबंधित कालावधीसाठी लागू असेल, त्याच दराने मुदत संपेपर्यंत व्याज दिले जाते. मात्र, जर या कालावधीत बँकेने ठेवींवरील व्याजदरात वाढ केली, तर ठेवीदारास वाढीव व्याजदराचा लाभ मिळत नाही.
Sudhakar Kulkarni writes about Floating Rate Term Deposit
Sudhakar Kulkarni writes about Floating Rate Term Depositsakal
Summary

बँकांच्या मुदत ठेवींवर प्रत्यक्ष रक्कम जमा करताना जो व्याजदर संबंधित कालावधीसाठी लागू असेल, त्याच दराने मुदत संपेपर्यंत व्याज दिले जाते. मात्र, जर या कालावधीत बँकेने ठेवींवरील व्याजदरात वाढ केली, तर ठेवीदारास वाढीव व्याजदराचा लाभ मिळत नाही.

बँकांच्या मुदत ठेवींवर प्रत्यक्ष रक्कम जमा करताना जो व्याजदर संबंधित कालावधीसाठी लागू असेल, त्याच दराने मुदत संपेपर्यंत व्याज दिले जाते. मात्र, जर या कालावधीत बँकेने ठेवींवरील व्याजदरात वाढ केली, तर ठेवीदारास वाढीव व्याजदराचा लाभ मिळत नाही. व्याजदरातील चढ-उतार अर्थव्यवस्थेतील परिस्थितीनुसार वरचेवर होत असतात. त्यादृष्टीने बँकांची; तसेच ग्राहकांची ‘इंटरेस्ट रिस्क’ कमी व्हावे या उद्देशाने सुमारे १२-१५ वर्षांपासून कर्जावरील व्याजदर ‘फ्लोटिंग रेट’ पद्धतीने आकारले जाऊ लागले. आजकाल बहुतेक सर्व प्रकारची कर्जे ‘फ्लोटिंग रेट’ पद्धतीनेच दिली जातात. याउलट ठेवींवरील व्याजदर हे ‘फिक्स्ड रेट’ पद्धतीनेच दिले जातात. मात्र, आता बँका ठेवींवरील व्याजही ‘फ्लोटिंग रेट’ पद्धतीने देऊ करीत आहेत. त्यासाठी ‘फ्लोटिंग रेट’ म्हणजे नेमके काय, हे आधी समजून घेऊ.

‘फ्लोटिंग रेट’ हा नेहमीच्या व्याजदरासारखा स्थिर (फिक्स्ड) नसतो, तर तो अर्थव्यवस्थेतील व्याजदरात होणाऱ्या चढ-उतारांनुसार कमी-अधिक होत असतो. ज्या व्याजदरातील चढ-उतारांमुळे यात कमी-अधिक बदल होतो, त्यास ‘रेफरन्स रेट’ असे म्हणतात. सर्वसाधारणपणे रेपो रेट, जी-सेक रेट, ट्रेझरी बिल रेट किंवा पोस्टातील एनएससीवरील इंटरेस्ट रेट हे ‘रेफरन्स रेट’ म्हणून घेतले जातात. यातील रेपो रेट व एनएससी इंटरेस्ट रेट समजण्यास सोपे आहेत.

एक जुलै २०२० पासून रिझर्व्ह बँकेने आपल्या आरबीआय बाँडचा व्याजदर ‘फ्लोटिंग रेट’ पद्धतीचा केला असून, यासाठीचा ‘रेफरन्स रेट’ हा ‘एनएससी इंटरेस्ट रेट’ असून, त्यावर ०.३५% इतके अधिक व्याज गुंतवणूकदारास दिले जाते. (सध्या एनएससी इंटरेस्ट रेट ६.८० टक्के असल्याने आरबीआय बाँडवरील व्याजदर ७.१५ टक्के आहे.

अजून ही पद्धत बहुतांश बँकांनी सुरू केलेली नाही. मात्र गेल्याच आठवड्यात खासगी क्षेत्रातील येस बँकेने आणलेली फ्लोटिंग रेट टर्म डिपॉझिट (एफआरटीडी) निश्चितच ठेवीदारांचे लक्ष आकर्षून घेईल, असे वाटते व अन्य बँकाही लवकरच असा पर्याय ग्राहकांना देऊ करण्याची शक्यता आहे.

येस बँकेच्या फ्लोटिंग रेट टर्म डिपॉझिटची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे-

  • रेफरन्स रेट : रेपो रेट जो सध्या ४.९ टक्के आहे.

  • किमान व कमाल गुंतवणूक रु. १०,००० व रु. ५ कोटी.

  • गुंतवणुकीचा कालावधी किमान १ वर्षे व कमाल ३ वर्षे,

मिळणारा व्याजदर :

अ) गुंतवणुकीचा कालावधी १ वर्षे ते १८ महिने रेपो रेट सध्या ४.९% + १.१% = ६% तर

ब) गुंतवणुकीचा कालावधी १८ महिने ते ३ वर्षे : रेपो रेट सध्या ४.९% + १.६% = ६.५% म्हणजे जर ‘आरबीआय’ने पतधोरण जाहीर करताना रेपो रेट वाढवून ५ टक्के केला, तर बँकेच्या ‘फ्लोटिंग रेट टर्म डिपॉझिट’वरील व्याजदर अनुक्रमे ६.१% व ६.६% होईल व हा बदल आपोआप होईल. पण भविष्यात रेपो रेट कमी झाल्यास ठेवीवरील व्याजदर त्या प्रमाणात कमी होईल.जर गुंतवणूकदार ज्येष्ठ नागरिक असेल तर कालावधीनुसार लागू होणारा दर ०.५०% अधिक असेल. गरज पडल्यास गुंतविलेल्या रकमेच्या ९० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळण्याची सुविधा आहे. ठेव रक्कम नियमानुसार पेनल्टी भरून मुदतपूर्व काढता येईल. आपल्या गुंतवणुकीवरील ‘इंटरेस्ट रिस्क’ कमी करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी याचा अवश्य विचार करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com