
लाइफ इन्शुरन्स कंपनीकडून ‘स्टॅंडअलोन’ पद्धतीनेसुद्धा ही पॉलिसी घेता येते. ‘स्टॅंडअलोन’ पद्धतीने जनरल इन्शुरन्स कंपनीकडूनसुद्धा ‘क्रिटिकल केअर इन्शुरन्स’ पॉलिसी घेता येते.
मागील लेखात ‘क्रिटिकल इलनेस केअर इन्शुरन्स’ची माहिती घेतली. ही पॉलिसी आपण लाइफ; तसेच जनरल इन्शुरन्स या दोन्ही कंपन्यांकडून घेऊ शकतो. लाइफ इन्शुरन्स कंपनीकडून आयुर्विमा पॉलिसीसोबत ‘रायडर’च्या स्वरूपात ही पॉलिसी घेता येते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
ॲडिशनल बेनिफिट रायडर
यामध्ये लाइफ इन्शुरन्स कव्हरसोबतच ‘क्रिटिकल इलनेस कव्हर’ दिले जाते व यात कोणकोणते गंभीर आजार समाविष्ट आहेत, याचा तपशील असतो. जर पॉलिसीधारकाचे पॉलिसीच्या कालावधीत समाविष्ट कोणत्याही आजारासाठी निदान झाले तर पॉलिसीधारकास ‘क्रिटिकल इलनेस कव्हर’ची रक्कम एकरकमी दिली जाते आणि मूळ लाइफ इन्शुरन्स पॉलिसी पुढे कालावधी संपेपर्यंत चालू राहते. (मात्र, यासाठी नियमित प्रीमियम भरावा लागतो.) जर पॉलिसीधारकाचा पॉलिसी कालावधीत मृत्यू झाल्यास वारसाला लाइफ इन्शुरन्स कव्हरची रक्कम दिली जाते.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ॲक्सलरेटेड बेनिफिट रायडर
लाइफ इन्शुरन्स कव्हरमध्येच ‘क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स कव्हर’ समाविष्ट असते. यातही कोणकोणते गंभीर आजार समाविष्ट आहेत, याचा तपशील असतो. पॉलिसीधारकाचे पॉलिसीच्या कालावधीत समाविष्ट कोणत्याही आजारासाठी निदान झाले, तर पॉलिसीधारकास ‘क्रिटिकल इलनेस कव्हर’ची रक्कम एकरकमी दिली जाते आणि मूळ लाइफ इन्शुरन्स पॉलिसी पुढे कालावधी संपेपर्यंत मूळ कव्हर वजा क्रिटिकल इलनेस कव्हर एवढ्या रकमेसाठी चालू राहते. (यासाठी नियमित प्रीमियम भरावा लागतो.) पॉलिसीधारकाचा पॉलिसी कालावधीत मृत्यू झाल्यास वारसाला उर्वरित लाइफ इन्शुरन्स कव्हरची रक्कम दिली जाते.
वरील दोन्हीही प्रकार पुढील उदाहरणावरून लक्षात येतील.
समजा, एखाद्याने रु. एक कोटीची टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे व सोबत रु. २५ लाखांचा ‘क्रिटिकल इलनेस कव्हर’चा ‘ॲडिशनल बेनिफिट रायडर’ घेतला आहे. जर या व्यक्तीचे समाविष्ट गंभीर आजारासाठी निदान झाले, तर त्याला निदान झाल्यापासून ३० दिवस हयात असल्यास ‘क्लेम’पोटी रु. २५ लाख एकरकमी मिळतील; तसेच जर या व्यक्तीचा पॉलिसीच्या कालावधीत मृत्यू झाला तर टर्म कव्हरचे रु. एक कोटी वारसास ‘क्लेम’पोटी मिळतील.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
याउलट जर या व्यक्तीने रु. एक कोटीची टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे व सोबत रु. २५ लाखांचा ‘क्रिटिकल इलनेस कव्हर’चा ‘ॲक्सलरेटेड बेनिफिट रायडर’ घेतला आहे. या व्यक्तीचे समाविष्ट गंभीर आजारासाठी निदान झाले तर त्याला निदान झाल्यापासून ३० दिवस हयात असल्यास ‘क्लेम’पोटी रु. २५ लाख एकरकमी मिळतील; तसेच या व्यक्तीचा पॉलिसीच्या कालावधीत मृत्यू झाला, तर टर्म कव्हरचे रु. १ कोटी वजा २५ लाख असे रु. ७५ लाख वारसास ‘क्लेम’पोटी मिळतील. मात्र, जर या व्यक्तीस समाविष्ट गंभीर आजाराचे निदान झाले नाही आणि जर पॉलिसीच्या कालावधीत मृत्यू झाला, तर वारसास रु. एक कोटीचा ‘क्लेम’ मिळेल. अर्थातच ‘ॲडिशनल बेनिफिट रायडर’साठीचा प्रीमियम जास्त असतो. लाइफ इन्शुरन्स कंपनीकडून ‘स्टॅंडअलोन’ पद्धतीनेसुद्धा ही पॉलिसी घेता येते. ‘स्टॅंडअलोन’ पद्धतीने जनरल इन्शुरन्स कंपनीकडूनसुद्धा ‘क्रिटिकल केअर इन्शुरन्स’ पॉलिसी घेता येते. सर्वसाधारणपणे ‘स्टॅंडअलोन’ पॉलिसीमध्ये ३५ ते ५० आजार समाविष्ट असतात व तुलनेने प्रीमियमही कमी असतो. ‘स्टॅंडअलोन’ पॉलिसी ही ‘रायडर’पेक्षा जास्त लवचिक (फ्लेक्झिबल) असते. यातसुद्धा पॉलिसीधारकाचे समाविष्ट आजारासाठी निदान झाल्यास पॉलिसीधारक ३० दिवसांनंतर हयात असल्यास ‘क्लेम’ एकरकमी दिला जातो.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला सोयीस्कर अशी ‘क्रिटिकल केअर स्टॅंडअलोन पॉलिसी’ मेडिक्लेम पॉलिसीसोबत घेणे निश्चितच हितावह आहे.
(लेखक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर- सीएफपी आहेत.)