आता पैसे काढा कार्डविना! 

सुधाकर कुलकर्णी 
Monday, 31 August 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आता ही सुविधा स्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, कोटक बॅंक, आयडीबीआय बॅंक, बॅंक ऑफ बडोदा या बॅंकाही देऊ लागल्या आहेत. 

डेबिट कार्ड न वापरता आपल्या बॅंकेच्या एटीएममधून रोख रक्कम काढता येऊ शकेल का, या प्रश्‍नाचे उत्तर "होय', असे आहे. गेल्या वर्षीपासून काही मोजक्‍या बॅंका ही सुविधा देऊ करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आता ही सुविधा स्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, कोटक बॅंक, आयडीबीआय बॅंक, बॅंक ऑफ बडोदा या बॅंकाही देऊ लागल्या आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आज आपण ही सुविधा कशी वापरावी, याची थोडक्‍यात माहिती घेऊया. 

- ही सुविधा आपल्या बॅंकेच्या मोबाईल ऍपद्वारे वापरता येते. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये आपल्या बॅंकेचे ऍप असणे आवश्‍यक आहे. 

- ही सुविधा फक्त आपल्या बॅंकेच्या एटीएमवरच वापरता येते. 

- यासाठी आपल्या बॅंकेच्या मोबाईल ऍपमधील "कार्डलेस कॅश' हा पर्याय निवडून त्यावर "क्‍लिक' करावे. 

- जेवढी रक्कम काढायची आहे, हे नमूद करून एक तात्पुरता चार आकडी पिन नंबर टाकावा व ज्या खात्यातून रक्कम काढायची आहे, तो खाते नंबर टाकावा. 

- आपण भरलेला तपशील बरोबर असल्याबाबतचे कन्फर्मेशन द्यावे. 

- आपला हा व्यवहार पूर्ण झाल्याबाबतचा मेसेज स्क्रीनवर दिसेल. 

- याच वेळी आपल्याला "एसएमएस'द्वारे एक युनिक कोड दिला जाईल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- आता आपण आपल्या बॅंकेच्या एटीएममध्ये जाऊन, वर उल्लेख केलेली रक्कम एटीएममधून काढू शकता. त्यासाठी एटीएम मशीनमधील "कार्डलेस कॅश' हा पर्याय निवडावा. एटीएम स्क्रीनवर आपला मोबाईल नंबर टाकून नंतर "एसएमएस'ने आलेला आलेला युनिक कोड टाकून रक्कम नमूद करावी. (ही रक्कम मोबाईल ऍपवर टाकलेल्या रकमेइतकीच असणे आवश्‍यक असते व ती एकदाच काढता येते). आलेला युनिक कोड 24 तासापर्यंतच वापरता येतो. एका दिवसात एकावेळी जास्तीतजास्त 10 हजार रुपये व एकूण 20 हजार रुपये इतकी रक्कम काढता येते. 
(लेखक सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर- सीएफपी आहेत.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sudhakar kulkarni writes article about withdraw money without card