esakal | पर्पेच्युअल बॉंड्‌सचा पर्याय कसा आहे? 
sakal

बोलून बातमी शोधा

bonds

मुदत ठेवींच्या तुलनेत पर्पेच्युअल बॉंड्‌सचा पर्याय आकर्षक वाटत असला तरी त्यातील जोखीम लक्षात घेतली पाहिजे. थोडक्‍यात, "जिथे परतावा जास्त, तिथे जोखीम जास्त', हे गुंतवणूकदारांनी लक्षात घेतले पाहिजे. 

पर्पेच्युअल बॉंड्‌सचा पर्याय कसा आहे? 

sakal_logo
By
सुहास राजदेरकर

सोहम - अरे पुष्कर, मी पुन्हा एका चांगल्या गुंतवणुकीची संधी गमावली रे... 

पुष्कर - ती कशी काय? 

सोहम - अरे, "एसबीआय'ने नुकतेच "पर्पेच्युअल बॉंड्‌स' बाजारात आणले होते आणि त्यामध्ये चक्क 7.74 टक्के व्याज होतं. तेसुद्धा पाच वर्षांसाठी! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुष्कर - मग आता? 

सोहम - अरे, मग काय? मला त्याबद्दल आधी कळलंच नाही रे. आपण त्याच बॅंकेच्या पाच वर्षांच्या मुदत ठेवींत पैसे गुंतवले तर व्याजदर फक्त 5.40 टक्केच मिळतो. 

पुष्कर - अरे, पण "एसबीआय'च्या मुदत ठेवींमध्ये रिस्क अजिबातच नाही, जी पर्पेच्युअल बॉंड्‌समध्ये आहे. तुला माहितीय का, येस बॅंकेच्या पर्पेच्युअल बॉंड्‌समध्ये गुंतवलेले पैसे बुडाले ते? 

सोहम - हो का? मला माहित नव्हतं. पण व्याजदर खूप आकर्षक आहे रे... मला या बॉंड्‌सची नीट माहिती सांग ना... 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुष्कर - अरे हो बाबा, सांगतो. या बॉंड्‌सना "ऍडिशनल टियर 1' (एटी1) किंवा "पर्पेच्युअल' असं म्हणतात. तू हे बॉंड्‌स सेकंडरी मार्केटमधून पण विकत घेऊ शकतोस. आज बाजारात 71 पर्पेच्युअल बॉंड्‌स आहेत, ज्यांची किंमत साधारणपणे एक लाख कोटी रुपये इतकी आहे. बॅंका हे बॉंड्‌स त्यांच्या भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी बाजारात आणतात. ज्यामध्ये एका बॉंडची किंमत 10 लाख रुपये असते, जी कमीतकमी गुंतवणूक आहे. या बॉंड्‌सवर दरवर्षी व्याज दिलं जातं, ज्यावर प्राप्तिकर लागू होतो. या बॉंड्‌सना परतफेडीचा ठरविक काळ नसतो. परंतु, बॅंका साधारणपणे पाच वर्षांनी पैसे परत करण्याचा निर्णय घेऊ शकतात, ज्याला "कॉल ऑप्शन' असं म्हणतात. आज बाजारात, पंजाब अँड सिंध बॅंकेचे पर्पेच्युअल बॉंड्‌स सर्वांत जास्त म्हणजे 9.50 टक्के परतावा देत आहेत, तर एचडीएफ़सी बॅंकेचे बॉंड्‌स सर्वांत कमी म्हणजे 5.80 टक्के परतावा देत आहेत. हे बॉंड्‌स खरेदी करण्यासाठी तुझ्याकडं डी-मॅट खातं असणं आवश्‍यक आहे. या बॉंड्‌सवर मुदत ठेवींपेक्षा 2 ते 3 टक्के जास्त व्याज मिळत असलं तरी त्यात काही रिस्क असतेच. 

सोहम - अरे बापरे, हो का? ती कोणती? 

पुष्कर - रिस्क म्हणजे कदाचित बॅंका व्याज देणं बंद करू शकतात. बॉंड्‌स हे "इक्विटी'मध्ये बदलू शकतात किंवा मुद्दलाचे पैसे देणं रद्दसुद्धा करू शकतात. हे बॉंड्‌स विनातारण असतात. या बॉंड्‌सचं रॅंकिंग "सिनियर' आणि "टियर-2' बॉंड्‌सच्या खाली आणि "इक्विटी'च्या वर असतं. समजा, पुढच्या काळात व्याजदर वाढले, तर सध्याच्या बॉंड्‌सची किंमत कमी होऊ शकते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तात्पर्य -  मुदत ठेवींच्या तुलनेत पर्पेच्युअल बॉंड्‌सचा पर्याय आकर्षक वाटत असला तरी त्यातील जोखीम लक्षात घेतली पाहिजे. थोडक्‍यात, "जिथे परतावा जास्त, तिथे जोखीम जास्त', हे गुंतवणूकदारांनी लक्षात घेतले पाहिजे. 

(लेखक ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार आहेत.)